शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आम्ही उत्तम बोलू शकतो म्हणून…”, राजकारणातील प्रवेशाबाबत मकरंद अनासपुरे स्पष्टच बोलले, म्हणाले, “आता म्हातारपणात…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 19, 2024 | 10:00 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
makrand anaspure

"आम्ही उत्तम बोलू शकतो म्हणून…", राजकारणातील प्रवेशाबाबत मकरंद अनासपुरे स्पष्टच बोलले, म्हणाले, "आता म्हातारपणात…"

आपल्या विनोदी भूमिकेने प्रेक्षकांच्या हृदयात जागा बनवणारे लोकप्रिय अभिनेते म्हणजेच मकरंद अनासपुरे. मकरंद अनासपुरे यांच्याकडे भन्नाट कॉमिक टाइमिंग आणि लोकांना हसवण्याचं नैसर्गिक असं कौशल्य आहे. गेल्या एक दशकाहून अधिक काळ त्यांनी मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. मकरंद अनासपुरे यांना एक अभिनेता, सामाजिक कार्यकर्ते आणि एक संवेदनशील व्यक्ती म्हणून आज सर्वत्र ओळखलं जात. मात्र सिनेसृष्टीतील त्यांचा हा प्रवास काही सोप्पा नव्हता. अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमधून लहान मोठ्या भूमिका साकारत मकरंद अनासपुरे यांनी प्रेक्षकांमध्ये आपली छाप पाडली. (Makarand anaspure on Politics)

यानंतर आता मकरंद अनासपुरे यांचा ‘राजकारण गेलं मिशीत’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आज हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवासांपासून मकरंद हे या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त होते. अशातच या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मकरंद यांनी राजकारणाबाबत भाष्य केलं. नुकतीच त्यांनी ‘रेडिओ सिटी’ ला मुलाखत दिली. यावेळी राजकारणात तुम्ही जाल का?, असा प्रश्न विचारला होता.

आणखी वाचा – हनुमान जयंतीच्या दिवशी पूजा करण्याची योग्य वेळ कोणती?, पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती?, तर ‘या’ राशींना होणार सर्वाधिक फायदा

View this post on Instagram

A post shared by Makrand Anaspure (@makrand.anaspure)

याचं उत्तर देत मकरंद अनासपुरे म्हणाले, “कलावंत म्हणून तीन दशक काढल्यानंतर चला आता म्हातारपणात राजकारणात जाऊ याला कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही. आमचा तेवढा अभ्यास आहे का?, राजकारणात जाणं म्हणजे हॉटेलमध्ये जाण्यासारख नाही आहे. चला आज या हॉटेलमध्ये जाऊन मस्तानी खाऊया इतकं हे सोप्प नसतं”.

आणखी वाचा – एकत्र जेवण, धमाल-मस्ती अन्…; वहिनीवर जीवापाड प्रेम करते श्रेया बुगडे, एकत्रित वेळही घालावला, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पुढे ते म्हणाले, “आमच्या क्षेत्रात येताना लोकं म्हणतात सर मला पण अभिनय करायचा आहे?, तर मी त्याला विचारतो, तू काय शिकला आहेस या क्षेत्रात. तो म्हणतो, काही नाही. कधीतरी शाळेत एकदा नाटकात काम केलं होतं. तर मी त्याला म्हणतो, तुला पंखा दुरुस्त करता येतो का?, तो म्हणतो, नाही. मी म्हणतो का?, तर तो म्हणतो, त्यातलं काही माहीत नाही. मी म्हटलं तसंच असतं प्रत्येक क्षेत्राचं. तुम्हाला तितका अभ्यास व अध्ययन केल्याशिवाय त्या क्षेत्रात जाण्याची मुभा नाही. आम्ही उत्तम बोलू शकतो म्हणून आम्ही संसदेत जाऊन भरपूर भाषणं केली, पण कार्य कुशलतेच काय?, मुळात राजकारण म्हणून समजून घेण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, जो आवाका लागतो तो तुमच्याकडे असला पाहिजे तर तुम्ही राजकारणात जाऊ शकता”.

Tags: entertainmentMakarand anaspure on PoliticsMakrand anaspuremarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Hansika Motwani breaks silence on divorce
Entertainment

“मला कोणताही पश्चात्ताप नाही”, लग्नाच्या तीन वर्षांतच संसार मोडला, सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली…

एप्रिल 17, 2026 | 9:41 am
Dnyanada Ramtirthkar Kelvan
Entertainment

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरची लगीनघाई, पहिल्या केळवणाचे फोटो समोर, ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील कलाकार…

एप्रिल 16, 2026 | 1:50 pm
Sonali Kulkarni latest post
Entertainment

विमानात रडणाऱ्या बाळाच्या कानाखाली मारली आणि…; आईच्या ‘त्या’ कृतीवर भडकली मराठी अभिनेत्री, सांगितला धक्कादायक प्रसंग

एप्रिल 16, 2026 | 1:22 pm
Akshay Kumar fitness :
Lifestyle

‘या’ बॉलिवूड अभिनेत्याने १५ वर्षांपासून खाल्ला नाहीय समोसा, वयाच्या ५९ व्या वर्षी आहे इतका फिट, कारण आहे…

एप्रिल 16, 2026 | 11:00 am
Next Post
Divyanka Tripathi Accident

दिव्यांका त्रिपाठीचा मोठा अपघात, गंभीर दुखापतीनंतर सर्जरीही होणार, नेमकं काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.