शनिवार, मे 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अहिल्यादेवींचं व्रत पूर्ण अन् पारुला सर्पदंश, देवीआईचा जीव वाचवून स्वतःचा जीव धोक्यात?, पुढे काय घडणार?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 24, 2024 | 9:32 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Paaru Serial Update

अहिल्यादेवींचं व्रत पूर्ण अन् पारुला सर्पदंश, देवीआईचा जीव वाचवून स्वतःचा जीव धोक्यात?, पुढे काय घडणार?

‘पारू’ या मालिकेत रंजक वळण आलेलं असताना आता पारूच्या जीवाला धोका असण्याची शक्यता समोर आलेली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची मालिकेबाबतची उत्सुकता आणखीनच वाढून राहिलेली पाहायला मिळत आहे. मालिकेत अहिल्यादेवी त्यांचं व्रत पूर्ण करण्यासाठी उपवास धरतात, मात्र या उपवासाचं पूर्णत्व हे २१ पाण्याचे हांडे नदी काठापासून मंदिरात घेऊन जाईपर्यंत असतात. ही कठीण परीक्षा आता अहिल्या देवींना पार करावी लागणार आहे. सगळेजण मंदिराकडे जमलेले असतात तेव्हा उन्हाच्या झळा सर्वांना लागत असतात. दरम्यान पारू सगळ्यांसाठी लिंबू सरबत बनवून आणून देते. त्यावर सगळेजण खुश होतात. (Paaru Serial Update)

पारू तिथून जात असताना काही मुलं तिथे शंख वाजवण्याचा प्रयत्न करत असतात मात्र त्यांना काही जमत नाही त्यावर पारू म्हणते तुम्हाला जमत नाही शंख वाजवायला द्या मी वाजवून दाखवते. पारू भर दुपारच्या वेळी शंख वाजवते त्यामुळे गुरुजींचा अध्ययन तुटण्याची दाट शक्यता असते, असं दुसरे गुरुजी येऊन सांगतात. आणि ते पारुला चांगलंच ओरडतात. त्यावर अध्ययन करणारे गुरुजी बाहेर येत पारूला आशीर्वाद देतात आणि सांगतात की देव तुझं भलं करो. हे ऐकून सगळेचजण चकित होतात. पारूला खुद्द अध्ययन करणाऱ्या गुरुजींचा आशीर्वाद मिळाल्याने ही खूप मोठी भाग्याची गोष्ट असते. पण देव बरे करो असा आशीर्वाद त्यांनी का दिला हा प्रश्न मात्र तसाच असतो. त्यानंतर अहिल्यादेवी नदीकाठी जाऊन ओल्या वस्त्राने हांडे मंदिरात घेऊन जाण्यासाठ तयार असतात.

आणखी वाचा – Video : विमानाने उड्डाण घेताच घाबरली लेक, समीर वानखेडे समजूत काढू लागले अन्…; क्रांती रेडकरने शेअर केलेल्या व्हिडीओची जोरदार चर्चा

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

त्यावेळेला अहिल्यादेवींचे पाय जमिनीवर उष्णतेने भाजू नयेत म्हणून पारू स्वतः कळशीने त्यांच्या पायापुढे पाणी ओतत असते आणि अहिल्यादेवी चालत असतात. मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की,अहिल्यादेवींनी पाणी भरून आणलेल्या हंड्यातून नाग वर येतो आणि पारू त्याला बघताच ती खूप घाबरते. तो नाग अहिल्यादेवींच्या हंड्यातून वर येत त्यांच्या हाताला दंश करतो, त्यानंतर पारू अहिल्यादेवींना धीर देते आणि स्वतःची कळशी फेकून देत पारू अहिल्यादेवींचा हात जवळ घेते आणि नागाने दंश केलेल्या भागातील विष स्वतःच्या तोंडाने खेचून ते विष फेकून देते.

आणखी वाचा – “फोन बंद करुन बसलास म्हणून…”, चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सोडताच अवधूत गुप्तेची कमेंट, म्हणाला, “निर्णय शहाणपाचा आहे का हे…?”

अहिल्यादेवी पारूच्या या हिमतीने आणि मदतीने हे व्रत पूर्ण करू शकतात. त्यानंतर अहिल्यादेवी व्रत पूर्ण झाल्यानंतर पारूला प्रसाद घेऊन जातात आणि म्हणतात की, तुझ्यामुळे आज माझं हे व्रत पूर्ण होऊ शकलं. पारू प्रसाद घेणार इतक्यात तिला चक्कर येऊन ती खाली पडते. आता अहिल्यादेवींचा व्रत पूर्ण करून अहिल्यादेवींचा जीव वाचवून पारूने स्वतःचा जीव धोक्यात टाकला आहे, आता पारूच्या जीवाचं काही बरं वाईट होईल का?, मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरेल.

Tags: entertainmentmarathi serialpaaru serialPaaru Serial Updatezee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 Sambhavna Seth life
Entertainment

चारवेळा गर्भपात, ६५ इंजेक्शन्स आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीला झालेल्या खूप वेदना, आता ४५ व्या वर्षी होणार आई

एप्रिल 30, 2026 | 3:00 pm
sambhavna seth is pregnant
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्री लवकरच होणार आई, चाहत्यांना दिली GOOD NEWS; ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

एप्रिल 30, 2026 | 1:16 pm
 anil gawas on aastad kale
Entertainment

“फोन वाजतो तिकडे तुमचं लक्ष का?”, आस्ताद काळेच्या त्या व्हिडीओवर अभिनेते स्पष्टच बोलले, म्हणाले, “प्रेक्षक तुम्हाला…”

एप्रिल 29, 2026 | 5:16 pm
Bharat kapoor death
Entertainment

‘चंद्रकांता’ फेम अभिनेत्याचे वयाच्या ८०व्या वर्षी निधन, राकेश बेदी अंत्यसंस्काराला उपस्थित

एप्रिल 28, 2026 | 9:42 am
Next Post
Bhau Kadam and Daughter

Video : लेकीने भाऊ कदम यांना स्वकमाईतून दिलं खास गिफ्ट, अभिनेत्याला काय बोलू हेही सूचेना, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "तुमच्यामुळे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.