सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांच्या यादीत एक नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे अभिनेत्री क्रांती रेडकर. क्रांतीने आजवर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. क्रांतीला जितकी लोकप्रियता मिळाली आहे त्याहून अधिक तिच्या लेकी लोकप्रिय आहेत. सोशल मीडियावरुन क्रांती नेहमीच तिच्या लेकींचे अनेक व्हिडीओ, फोटो शेअर करत असते. क्रांतीला दोन जुळ्या मुली आहेत. झिया व झिदा अशी त्यांच्या मुलींची नाव आहेत. लाडाने ती तिच्या लेकींना छबिल व गोदो अशी हाक देते. (Kranti redkar daughetr and husband video)
अशातच क्रांतीने सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये बाप-लेकीचं अनोखं नातं पाहायला मिळत आहे. क्रांतीने हा बाप-लेकीचा सुंदर क्षण तिच्या कॅमेऱ्यात कैद केला होता. हा व्हिडीओ शेअर करत तिने जुन्या आठवणींना उजाळा देत हा व्हिडीओ सर्व वडिलांना समर्पित केला आहे. क्रांतीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये क्रांतीची लेक गोदोला विमानात बसण्याची भीती वाटते.
क्रांतीने हा व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “आम्ही विमानात होतो आणि आम्हाला विमान हलताना (टर्ब्युलन्स) जाणवलं. आमची मुलगी गोदो समीरच्या बाजूला बसली होती. ती घाबरू नये म्हणून तो तिच्याशी मुद्दाम, ठरवून गप्पा मारत राहिला. हेच वडील करतात. ते समोर आलेल्या भीतीची ढाल बनतात, भिंत बनतात, जी प्रत्येक वादळापासून त्यांच्या मुलांचे रक्षण करते. हे जगातल्या सगळ्या वडिलांसाठी आहे की, तुम्ही खूप चांगलं काम करत आहात”.
हा व्हिडीओ शेअर करत क्रांतीने कॅप्शन देत म्हटलं आहे की, “मला असे छोटे आणि आशयघन व्हिडीओ कॅप्चर करायला खूप आवडतात. माझ्याकडे ते गॅलरीत आहेत आणि मी माझ्या वेळेनुसर ते पाहत असते. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील खरे क्षण आहेत जे खूप महत्त्वाचे आहेत. हे क्षण निरागस व कोमल आहेत, असे क्षण जे चिरंतन बंध निर्माण करतात. या सर्व वडिलांना चिअर्स”, असं म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.