मराठी मनोरंजन विश्वातील विनोदी कलाकारांच्या यादीत एका अभिनेत्याचे नाव आवर्जून घेतलं जातं तो अभिनेता म्हणजे भाऊ कदम. ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून अनेक वर्ष प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यात भाऊ कदमचा खूप मोठा वाटा आहे. या कार्यक्रमातून भाऊने त्याच्या विनोदाच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांची मन जिंकली. मात्र आता या कार्यक्रमाने निरोप घेतला असला तरी भाऊ आता नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. (Bhau Kadam and Daughter)
‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ या कलर्स मराठी वाहिनीवरील नव्या शोमधून भाऊने एन्ट्री घेतली असून यातून तो प्रेक्षकांच्या मनावर पुन्हा एकदा राज्य करण्यास सज्ज झाला आहे. सोशल मीडियावरही भाऊ बऱ्यापैकी सक्रीय असतो. नेहमीच काही ना काहीतरी शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. भाऊ नेहमीच त्याच्या कुटुंबाबरोबरचे अनेक फोटो,व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर करत असतो. भाऊ बरोबरच त्याची थोरली लेक ही बऱ्यापैकी सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर असून नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
अशातच भाऊसाठी म्हणजेच तिच्या वडिलांसाठी लाडक्या लेकीने एक खास गिफ्ट घेतलं असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्वकमाईतून म्हणजेच स्वतःच्या पहिल्या कमाईतून तिने घेतलेलं हे गिफ्ट खास तिच्या वडिलांसाठी गिफ्ट केलं आहे. मृण्मयीने त्यांना शूजच्या दुकानात घेऊन जात त्यांच्यासाठी हे खास शूज भेटवस्तू म्हणून दिली आहे. बरं यावर थँक्यू बोलण्याच्या ऐवजी भारतीय पालकांचा नेहमीचा थँक्यू बोलण्याचा उद्देश भाऊने पुढे नेला आहे. भाऊने थँक्यू म्हणण्याऐवजी यावेळी मला कशाला घ्यायचं हे पैसे तुलाच ठेवायचे ना, तुला उपयोगी पडले असते, असं म्हटलं.
बाप लेकीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. दोघांमधला बॉण्डिंग हा खूपच खास असल्याचं नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. मृण्मयीच्या या पोस्टला चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया देत तिचं कौतुक केलं आहे. तर अनेकांनी व्हिडीओला पसंती दर्शविली आहे.