‘पारू’ मालिकेत एका मागोमाग रंजक वळणे येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत सध्या सगळेचजण मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसले. किर्लोस्कर बंगल्यात सावित्रीची मंगळागौर अगदी थाटामाटात संपन्न झाली. मात्र, आदित्य बरोबरच्या लग्नाचे सत्य अद्याप सगळ्यांनी लपवून ठेवलं आहे. तर हे सत्य फक्त सावित्रीला माहित आहे. लग्नाच सत्य लपवून ठेवून पारू आदित्यची सुरक्षा कवच म्हणून साथ देताना दिसत आहे. ज्या क्षणी पारूने गळ्यातील मंगळसूत्र काढलं त्याक्षणी आदित्यच्या जीवाला धोका निर्माण होतो. आणि याचे अनेक क्षण अनुभवले आहेत.अहिल्यादेवींना फक्त ऍड शूटसाठी लग्न केले हे कळालं तेव्हा त्यांनी आदित्य बरोबर बोलणं टाकून दिलं होतं.(Paaru Serial Update)
त्यामुळे ही गोष्ट आता अहिल्या देवींना सांगून चालणार नाही आणि आदित्य सरही हे सत्य मेनी करणार नाहीत असं पारूला वाटतं. त्यामुळे ती हे सत्य सर्वांपासून लपवून ठेवते. अहिल्या देवींना, किर्लोस्कर कुटुंबाला त्रास होईल असं काहीच वागायचं नाही असं पारू ठरवते.मालिकेच्या एका नव्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पारू सतत पुढे पुढे करते असं दिशा व दामिनीच म्हणणं असतं. मंगळागौरीच्या कार्यक्रमातही पारूमुळे दिशा दामिनीचा डाव फसतो आणि त्यांच्यावरच उलटतो. अहिल्यादेवीसमोर दिशा दामिनीला खोटं ठरवत पुन्हा एकदा त्यांना तोंडावर पाडते. हा सगळा राग लक्षात ठेवून दिशा व दामिनी पारूचा बदला घ्यायचा ठरवते.
पारू हा आपल्या यशामधील काटा आहे आणि तो काढूनच टाकायला हवा असं म्हणत नवा डाव आखते. त्यामुळे ती पारूचे फोटो शूट करायचे ठरवते आणि सांगते की, “मी तिचं असं काही फोटो शूट करेन की तिला तोंड दाखवायला जागा उरणार नाही आणि तिची इमेज सर्वांसमोर येईल”. तर या गोष्टीला दामिनी दिशाला साथ देते. तर इकडे अहिल्यादेवी व श्रीकांत बोलत असतात.
तेव्हा अहिल्यादेवी गुरुजींनी आपल्याला सांगितलं होतं की, आदित्यच सुरक्षा कवच हे त्याच रक्षण करत आहेत.आणि हे सुरक्षा कवच त्याच्या आजूबाजूला आहे. त्यामुळे आता आदित्यला मुलगी शोधायला हवी. अहिल्यादेवी आदित्य समोर येतात आणि म्हणतात की, आता तुझं लग्न करायचं आहे. मुलगी शोधायला हवी. त्यावर आदित्य अहिल्यादेवींना आरशासमोर नेतो आणि म्हणतो की, मला अशीच मुलगी हवी आहे. अगदी तुझी सावली. तितक्यात तिथं पारू येते. आता अहिल्यादेवी आदित्यसाठी मुलगी शोधणार का?, आणि त्या सून म्हणून पारूची निवड करणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.