बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पारूनेही केली आदित्यसाठी वडाची पूजा, सावित्रीसमोर आलं मंगळसूत्राचं सत्य, अहिल्यादेवी तिचा सून म्हणून कधी स्वीकार करतील का?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 19, 2024 | 4:19 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Paaru Serial Promo

पारूनेही केली आदित्यसाठी वडाची पूजा, सावित्रीसमोर आलं मंगळसूत्राचं सत्य, अहिल्यादेवी तिचा सून म्हणून कधी स्वीकार करतील का?

‘पारू’ या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहे. मालिकेच कथानक पारूभोवती फिरताना दिसत आहे. अशातच वटपौर्णिमेनिमित्त पारू आदित्यसाठी वडाची पूजा करायचं ठरवते. आदित्यच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा करण्याचा निश्चय ती करते, त्याचवेळी तिथे दिशा व दामिनी येतात. तेव्हा पारू बाजू सांभाळून त्यांना वेगळं काही बोलली असल्याचं सांगते. अशातच मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये पारूच्या गळ्यातील मंगळसूत्राचं सत्य समोर आलेलं पाहायला मिळत आहे. (Paaru Serial Promo)

इकडे अहिल्यादेवी वडाची पूजा करतात ते पाहून पारू मनात म्हणते की, मी आदित्य सरांची बायको असूनही मी ही पूजा करु शकत नाही. पूजा झाल्यानंतर अहिल्यादेवी निघायचं असं म्हणून पुढे जातात. तेव्हा पारूच्या चैनमध्ये वडाची एक पारंबी अडकते आणि पारू पुढे जाते तेव्हा तिचं मंगळसूत्र बाहेर येतं. यावर पारू म्हणते, आता कसला संकेत आहे. आता मला ही पूजा करायलाच पाहिजे. आदित्य सरांच्या दीर्घायुष्यासाठी मला हे व्रत करावंच लागेल, असं म्हणत पारू वडाची पूजा करते.

आणखी वाचा – रस्त्यावर भर गर्दीत असा शूट करण्यात आला लीलाचा ‘तो’ सीन, खरंच गाडीसमोर पडली अन्…; BTS Video समोर

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

तर इकडे घरी आल्यानंतर अहिल्यादेवी व श्रीकांत उपवास सोडत असतात. तेव्हा अहिल्यादेवी श्रीकांतच्या ताटातील उष्ट अन्न खाते. यावर श्रीकांत त्यांना थांबवतो. मात्र अहिल्यादेवी म्हणतात की, आज बायकोने नवऱ्याचं उष्ट खायचं असतं, अशी किर्लोस्करांची प्रथा आहे, असं म्हणत ते जेवू लागतात. त्यानंतर आदित्यही जेवत असतो. आदित्यचं जेवून झाल्यानंतर पारू त्याच ताट स्वयंपाकघरात घेऊन येते आणि आदित्यच्या ताटातील उष्ट अन्न खाते. त्यावेळी सावित्री मागे उभी राहून सर्व पाहत असते. त्याचवेळी पारूच्या गळ्यातील मंगळसूत्र बाहेर येतं. आणि सावित्री घाबरुन म्हणते, पारू तुझ्या गळ्यात मंगळसूत्र. सावित्रीचा आवाज ऐकून पारूही घाबरते.

आणखी वाचा – Sonakshi Sinha Wedding : सोनाक्षी सिन्हाच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, हळदीमध्ये फक्त ५० लोकांना एन्ट्री, काय असणार खास?

आता पारूच्या व आदित्यच्या लग्नाचं सत्य पारू सावित्रीला सांगणार का?, सावित्री पारूची बाजू सांभाळून घेणार का?, हे सर्व मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहणं रंजक ठरणार आहे.

Tags: marathi serialPaaru Serial PromoPaaru Serial Updatezee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
vadapav girl in big boss ott

"रस्त्यावर भांडणारी शोमध्ये का?", 'बिग बॉस ओटीटी'मध्ये व्हायरल वडापाव गर्लच्या एन्ट्रीमुळे प्रेक्षक भडकले, म्हणाले, "तिने असं काय केलं?"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.