शनिवार, एप्रिल 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Sonakshi Sinha Wedding : सोनाक्षी सिन्हाच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, हळदीमध्ये फक्त ५० लोकांना एन्ट्री, काय असणार खास?

Saurabh Moreby Saurabh More
जून 19, 2024 | 1:52 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood actress Sonakshi Sinha and Zaheer Iqbal's Haldi ceremony will be held on 20 June.

Sonakshi Sinha Wedding : सोनाक्षी सिन्हाच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, हळदीमध्ये फक्त ५० लोकांना एन्ट्री, काय असणार खास?

‘हिरामंडी’ या सीरिजमुळे व स्वत:च्या लग्नामुळे सध्या सोनाक्षी सिन्हा ही चांगलीच चर्चेत आहे. लवकरच अभिनेत्री प्रियकर झहीर इक्बालबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री येत्या २३ जून रोजी लग्न करणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या जोडप्याने अद्याप त्यांच्या लग्नाबाबत अधिकृतपणे काहीही जाहीर केले नसले तरी अनेक कलाकारांनी सोनाक्षी-झहीरचे लग्न होणार असल्याबद्दल सांगितले आहे.

सध्या त्यांच्या लग्नाआधीच्या विधींनादेखील सुरुवात झाली आहे. सोमवारी, या जोडप्याने बॅचलर पार्टीचा आनंद लुटला, ज्याचे फोटो त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरदेखील शेअर केले. आता सोनाक्षी-झहीरच्या प्री-वेडिंग फंक्शनची माहितीही आली आहे. ‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार, एका सूत्राकडून माहिती मिळाली आहे की हे उद्या म्हणजेच २० जून रोजी सोनाक्षी-झहीरचा हळदी सोहळा पार पडणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Zaheer Iqbal (@iamzahero)

सोनाक्षीच्या बांद्रा येथील नवीन घरात तिचं हळदी सोहळा होणार आहे. सोनाक्षीच्या पालकांनी हे घर सोडल्यानंतर स्वत: सोनाक्षीने हे घर खरेदी केले आहे. या सोहळ्यासाठी फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित राहतील आणि या सोहळ्यासाठी ५० पेक्षा कमी लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे हळदी सोहळ्यासाठी सोनाक्षीने तिच्या स्वत:च्या नवीन घराची निवड केली आहे.

आणखी वाचा – “मुर्दाड बघ्यांचं काय करायचं?”, वसई हत्या प्रकरणाबाबत प्रसिद्ध दिग्दर्शकाची संतप्त पोस्ट, म्हणाला, “पोलिसांचा धाक आहे का?”

सोनाक्षी-झहीरने यांना त्यांचे लग्न अत्यंत खाजगी ठेवायचे होते. तरीदेखील ते लवकरच एका मोठ्या पार्टीचेही आयोजन करणार आहे. या जोडप्याने त्यांच्या लग्नासाठी शिल्पा शेट्टीचे मुंबईमधील एक रेस्टॉरंट निवडले आहे. IANSच्या वृत्तानुसार, सोनाक्षी-झहीर त्यांच्या लग्नात पांढऱ्या थीमचे कपडे परिधान करणार आहेत. तथापि, त्यांच्या लग्नातील  जेवणाबद्दल अद्याप काहीही माहिती समोर आलेली नसली तरी अनेकजण या लग्नाची वाट बघत आहेत.

आणखी वाचा – वडिलांनी ज्या हॉटेलमध्ये टेबल पुसले, त्याच हॉटेलचा मालक आहे सुनील शेट्टी, अभिनेत्याने सांगितली त्याची संघर्ष कहाणी

दरम्यान, आज १९ जून रोजी सोनाक्षी व झहीर यांचा संगीत सोहळा आहे, तर उदय त्यांचा हळदी सोहळा पार पडणार आहे. तसेच २२ जूनला त्यांचा साखरपुडा होणार असून त्यानंतर २३ जून रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती मिळत आहे.

Tags: bollywood actressBollywood entertainment newssonakshi SinhaSonakshi Sinha Marriage
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
anupam kher sold mumbai home
Entertainment

भाड्याने राहायला सुप्रसिद्ध अभिनेत्याने विकलं घर, २२ वर्षात आलिया भट्टने घेतल्या अभिनेत्याच्या दोन्ही मालमत्ता, किंमत…

एप्रिल 25, 2026 | 10:18 am
Nehha Pendse tv shows
Entertainment

“त्याने मला अचानक पकडलं”, मुंबईच्या भररस्त्यात अभिनेत्रीसह घडलं असं काही की…; म्हणाली, “जवळ जाऊन…”

एप्रिल 25, 2026 | 9:57 am
Next Post
Raj Hanchanale Home

प्रशस्त हॉल, बाल्कनीतील सजावट अन्…; 'प्रेमाची गोष्ट' फेम सागरचं घर आहे इतकं सुंदर, पाहा Inside Video

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.