बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रस्त्यावर भर गर्दीत असा शूट करण्यात आला लीलाचा ‘तो’ सीन, खरंच गाडीसमोर पडली अन्…; BTS Video समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 19, 2024 | 1:25 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hitlerla Bts Video

रस्त्यावर भर गर्दीत असा शूट करण्यात आला लीलाचा 'तो' सीन, खरंच गाडीसमोर पडली अन्...; BTS Video समोर

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. मालिकेत आलेल्या रंजक वळणामुळे ही मालिका अधिक पाहिली जात आहे. एजेंच्या व लीलाच्या मनाविरोधात त्यांचं लग्न झालेलं पाहायला मिळत आहे. मालिकेचे कथानक थोडे हटके असून दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता वाढत असताना पाहायला मिळतेय. या मालिकेत राकेश बापट हा एजे म्हणजे अभिराम जहागीरदार व वल्लरी लोंढे ही लीलाची भूमिका साकारताना दिसत आहे. दोघांची मालिकेत मनाविरुद्ध सुरु झालेली प्रेमकहाणी कोणतं वळण घेणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. (Navri Mile Hitlerla Bts Video)

मालिकांना लोकप्रियता मिळते पण यामागील कलाकारांची मेहनतदेखील खूप असते. इतकंच नव्हे तर कलाकारांबरोबरच पडद्यामागे काम करणाऱ्या साऱ्यांचेही यासाठी तितकेच श्रेय असते. सेटवर काम करत असताना कलकारांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पण त्यांच्यातील अभिनयाची आवड व जिद्द यामुळे कलाकार कोणत्याही परिस्थितीमध्ये आपले काम चोखपणे करताना दिसतात.

आणखी वाचा – श्रद्धा कपूरने राहुल मोदीबरोबरच्या प्रेमाची जाहीरपणे दिली कबुली, एकत्र फोटोही केला शेअर, म्हणाली, “माझं हृदय…”

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

अशातच अभिनेत्री वल्लरी लोंढे हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. वल्लरी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच वल्लरीने शेअर केलेल्या एका स्टोरीने लक्ष वेधलं आहे. यामध्ये मालिकेतील चित्रीकरण पाहायला मिळत आहे. रस्त्यावर लीला अचानक गाडीसमोर येते आणि खाली पडते हा सीन दाखविण्यात आलं आहे.

आणखी वाचा – अभिषेक बच्चनने बोरिवलीत खरेदी केले एक नव्हे तर तब्बल सहा घरं, किंमत ऐकून व्हाल थक्क

त्यानंतर लीला हसताना दिसत आहे आणि किशोर तिला हात देत उठायला मदत करत आहे. लीलाच हे मालिकेतील बीटीएस पाहून कलाकारांची सीनसाठीची मेहनत पाहायला मिळत आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील कलाकार नेहमीच अनेक ट्रेंडिंग रीलवर व्हिडीओ करत असतात. त्यांचे हे रील व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीसही पडतात.

Tags: marathi serialnavri mile hitelarlaNavri Mile Hitlerla Bts Videozee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Bollywood actress Sonakshi Sinha and Zaheer Iqbal's Haldi ceremony will be held on 20 June.

Sonakshi Sinha Wedding : सोनाक्षी सिन्हाच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, हळदीमध्ये फक्त ५० लोकांना एन्ट्री, काय असणार खास?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.