Paaru Serial New Twist : ‘पारू’ मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत नकारात्मक पात्राच्या एन्ट्रीने कथानकाची उत्सुकता वाढून राहिली आहे. मालिकेत अनुष्का या पात्राची एंट्री झाली असून हे पात्र किर्लोस्कर कुटुंबाचा नाश करण्यासाठी आलं आहे. इतकंच नव्हेतर अनुष्का ही दिशाची बहीण असून, बहिणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अनुष्का किर्लोस्कर मेन्शनमध्ये शिरली आहे. सगळ्यांशी चांगले वागून अनुष्काने प्रत्येकाच्या मनात घर केलं आहे. तर अनुष्काने सर्वप्रथम पारूचा काटा काढायचा निश्चय केला आहे. अशातच नववर्षाच्या सुरुवातीलाच अनुष्काने पारूला धडा शिकवलेला प्रोमो समोर आला आहे. वीन वर्षाच्या सुरुवातीला पारूवर संकट आलेलं पाहायला मिळत आहे.
‘झी मराठी’ वाहिनीने ‘पारू’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला असे पाहायला मिळत आहे की, पारू कारजवळ उभी राहून आदित्यबरोबर फोनवर बोलत असते. त्यावेळी तिथे काही तरुण पारूजवळ येतात आणि त्यातील एक माणूस पारूला म्हणतो की, “मॅडम मी तुमचा लय मोठा फॅन आहे. एक फोटो देता का प्लीज?”. पारू आदित्यशी बोलत असल्याने फोन सुरुच असतो. आणि ती फोटो घ्यायला मानेने होकारही देते. समोरच्या व्यक्तीचे बोलणे आदित्यच्या कानावर पडते तेव्हा त्याला सुद्धा पारूचं कौतुक वाटतं. ‘फॅन वगैरे’ असे म्हणत तो तिचे कौतुक करतो आणि चाहत्यांसह फोटो काढायला पारूला प्रोत्साहन देतो.
आणखी वाचा – कियारा अडवाणी रुग्णालयात भरती?, अभिनेत्रीच्या टीमने सांगितलं सत्य, नेमकं काय झालं?
अनुष्का मनातल्या मनात पारूला म्हणते की, तुझा आजचा दिवस तुझ्या कायम आठवणीत राहणार आहे. तो माणूस पारूबरोबर फोटो काढण्यासाठी पुढे येतो आणि तिच्याजवळ उभा राहतो. पारू त्याला म्हणते की, “जरा सरकून उभे राहता का?”. यावर तो माणूस म्हणतो की, “इतका चिकना माल समोर असताना कोणाची नियत बिघडणार नाही”. त्यानंतर तो हाताची एक बाटली उघडतो. पारू त्या माणसाला विचारते की, “काय करताय?”. आदित्य हे संभाषण ऐकून बेचैन होतो आणि पारूला तिथून निघून जाण्याचा सल्ला देतो.
आणखी वाचा – क्रिकेटर युजवेंद्र चहल व धनश्री वर्मा घटस्फोट घेणार?, नक्की दोघांमधील वाद काय?, चर्चांना उधाण
पण तितक्यात तो माणूस पारूच्या चेहऱ्यावर शाई फेकतो. या प्रकारानंतर शेवटी अनुष्का हसताना दिसत आहे. यादरम्यान, अनुष्काने त्या माणसांना पैसे दिल्याचेदेखील पाहायला मिळाले. आता आदित्य पारूला या सगळ्यातून कसे बाहेर काढणार, अनुष्का त्यांच्या मैत्रीत कशी फूट पाडणार, अनुष्काचे सत्य सर्वांना समजणार का हे पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.