बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या आगामी ‘गेम चेंजर’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती राम चरणबरोबर अभिनय करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सगळ्या दरम्यान, कियारा अडवाणीला रुग्णालयात दाखल केल्याची बातमी नुकतीच पसरली आहे. त्यावर आता अभिनेत्रीच्या टीमने संपूर्ण सत्य सांगितले आहे. अभिनेत्री कियारा अडवाणी रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी नुकतीच सोशल मीडियावर पसरली. शनिवारी सकाळी मुंबईतील रुग्णालयात तिला दाखल करण्यात आल्याचे वृत्त समोर येताच तिच्या चाहत्यांनी अभिनेत्रीबद्दल चिंता व्यक्त केली. यावर आता तिच्या टीमकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. (kiara advani admitted)
अभिनेत्री आज मुंबईत तिच्या आगामी ‘गेम चेंजर’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच आणि पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार होती. मात्र, ती या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकली नाही. यानंतर बातम्या येऊ लागल्या की, कियाराला आज सकाळीच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, तिला रुग्णालयात दाखल करण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, अभिनेत्रीच्या टीमने या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीच्या टीमने सांगितले की कियाराला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही.
आणखी वाचा – क्रिकेटर युजवेंद्र चहल व धनश्री वर्मा घटस्फोट घेणार?, नक्की दोघांमधील वाद काय?, चर्चांना उधाण
कियाराच्या टीमने सांगितले की, अभिनेत्री सतत काम करत असल्याने तिला थकवा जाणवला आणि या थकव्यामुळे तिला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे अभिनेत्री विश्रांती घेत आहे. ती विश्रांती घेत असल्यामुळे ‘गेम चेंजर’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच आणि पत्रकार परिषदेला ती उपस्थित राहिली नाही. कियारा गैरहजर राहिल्यानंतर शोचा निवेदक नितीनने ती हॉस्पिटलाइज्ड असल्याचं सांगितलं आणि यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता.
आणखी वाचा – अखेर प्रतीक्षा संपली! ‘दहावी-अ’ वेबसीरिज ‘या’ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार, उत्सुकता वाढली
दरम्यान, ‘गेम चेंजर’च्या मुंबईतील कार्यक्रमात अभिनेता राम चरण, एस. जे. सुर्या, निर्माता दिल राजू, अनिल थडानी आणि चित्रपटाची टीम हजर होती. या चित्रपटात राम चरणसह सुनील, नासिर, शुभलेखा सुधाकर, प्रकाश राज, प्रवीणा आणि मुरली शर्मा हे कलाकारही दिसणार आहेत. येत्या १० जानेवारी जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.