‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अक्षरा आणि अधिपतीमध्ये दुरावा आल्याचा सीक्वेन्स चालू आहे. सतत होणाऱ्या भांडणांना कंटाळून अधिपती अक्षराला घर सोडून जाण्याचा सल्ला देतो. अक्षरा सुद्धा काहीही आक्षेप न घेता घराबाहेर पडण्याचा निर्णय घेते. अशातच मालिकेत सध्या अक्षरा गरोदर असल्याचा नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अक्षराने नुकतंच सूर्यवंशींचं घर सोडलं आहे. अक्षराला घराबाहेर काढल्यावर भुवनेश्वरी आणि तिची बहीण दुर्गेश्वरी या दोघींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मालिकेत एकीकडे अक्षरा आई होणार आहे, तर दुसरीकडे त्यांचा अबोलाही पाहायला मिळत आहे. (tula shikvin changlach dhada serial update)
अक्षरा अधिपतीच्या संवाद साधण्याचा आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. पण अधिपतीशी तिचा काहीही संवाद होत नाहीये. अक्षराने अधिपतीच्या मोबाइलवर फोन करण्याचा प्रयत्न करते आहे. पण अधिपतीपर्यंत तिचा फोन पोहोचू शकत नाही. दोघांमधील या चुकीच्या संवादामुळे दोघांमधील गैरसमज आणखीनच वाढत आहेत आणि हे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न त्यांचे मित्र करत आहेत.
अशातच आता त्यांची भेट होणार आहे. मालिकेचा एक प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, ज्यात अक्षरा-अधिपतीची भेट घडवून आणणार आहेत. अक्षरा फोनवर तिच्या आईला अधिपतीला भेटायला जात असल्याचे सांगते. मात्र याबद्दल दुर्गेश्वरीला माहीत पडतं आणि याबद्दल ती भुवनेश्वरीला सांगते. मास्तरीनबाई आपल्या अधिपतीला भेटायला जाणार आहे असं ती भुवनेश्वरीला सांगते. मालिकेच्या या प्रोमोवरुन अखेर अधिपती व अक्षरा यांची भेट होणार असल्याचे दिसत आहे. पण भुवनेश्वरी त्यांच्या भेटीत काहीना काही व्यत्यय आणणार हे नक्की.
आणखी वाचा – कियारा अडवाणी रुग्णालयात भरती?, अभिनेत्रीच्या टीमने सांगितलं सत्य, नेमकं काय झालं?
त्यामुळे आता अधिपती व अक्षरा यांची भेट होणार का? अक्षरा अधिपतीला ती आई होणार असल्याची गुडन्यूज देणार का? की या दोघांची भट घडवून न आणण्यात भुवनेश्वरी पुन्हा एकदा यशस्वी होणार? हे लवकरच प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तसंच अक्षरा आई होणार असल्याची गुडन्यूज ऐकून अधिपतीचा अक्षरावरचा राग शांत होणार का? आणि दोघे आपापसातील मतभेद, भांडण विसरुन पुन्हा एकत्र येणार का? याचीही अनेक प्रेक्षक वाट बघत आहेत.