भारताचा स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहल हा त्याच्या खेळामुळे कायमच चर्चेत राहत असतो. मात्र सध्या तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. युजवेंद्र चहल याच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याच्या चर्चा होत आहेत. गेल्या महिन्यात २२ डिसेंबरला युजवेंद्र चहल व धनश्री वर्मा यांच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण झाली. कोरोनाच्या काळात २०२० मध्ये दोघांनी लग्न केले. युजवेंद्र चहलचे धनश्रीबरोबर डान्स करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात. दोघे एकमेकांबरोबरचे खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसले. मात्र, आता त्यांच्या नात्याबद्दलच्या विविध चर्चा सुरु आहेत. (yuzvendra chahal and dhanashree verma divorce)
धनश्री वर्मा व युझवेंद्र चहल यांचा घटस्फोट होत असल्याची अफवा पसरली आहे. मात्र या अफवा का पसरवल्या जात आहेत याबद्दल जाणून घेऊया. क्रिकेटर युजवेंद्र चहल इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. तो नेहमीच सोशल मीडियावर मस्ती करताना पाहायला मिळतो. पण आता त्याच्या एका कृतीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. वास्तविक, क्रिकेटरने पत्नी आणि कोरिओग्राफर धनश्रीला त्याच्या इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे आणि तिच्याबरोबरचे सर्व फोटोही सोशल मीडियावरुन हटवले आहेत.
तथापि, युजवेंद्रने इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर धनश्रीबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे, जो त्याच्या रणवीर अलाहाबादियाबरोबरच्या पॉडकास्टमधून आहे. धनश्रीनेही युजवेंद्रला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. पण त्याच्याबरोबरचे फोटो हटवलेले नाहीत. या डिलिट केलेल्या फोटोमुळे युजवेंद्र व धनश्री यांचे वैवाहिक जीवन चांगले चालत नसल्याची अफवा पसरली जात आहे आणि यामुळेच आता हे जोडपे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचेही म्हटलं जात आहे.
आणखी वाचा – अखेर प्रतीक्षा संपली! ‘दहावी-अ’ वेबसीरिज ‘या’ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार, उत्सुकता वाढली
दरम्यान, ‘झलक दिखला जा ११’ च्या एका एपिसोडमध्ये धनश्रीला शोचे होस्ट गौहर खान आणि ऋत्विक धनजानी यांनी युजवेंद्रबरोबरच्या लव्हस्टोरीबद्दल विचारले होते. तेव्हा धनश्री खुलासा केला होता की, लॉकडाऊन युझवेंद्रने पहिल्यांदा डान्स शिकण्यासाठी त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा याची सुरुवात झाली. यजुवेंद्रने विद्यार्थी होण्यासाठी तिच्याशी संपर्क साधला असता डान्स शिकवताना हे जोडपे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर २०२० मध्ये लग्नही केलं.
आणखी वाचा –
तथापि, युजवेंद्रने इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर धनश्रीबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे, जो त्याच्या रणवीर अलाहाबादियाबरोबरच्या पॉडकास्टमधून आहे. धनश्रीनेही युजवेंद्रला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. पण त्याच्याबरोबरचे फोटो हटवलेले नाहीत. या डिलिट केलेल्या फोटोमुळे युजवेंद्र व धनश्री यांचे वैवाहिक जीवन चांगले चालत नसल्याची अफवा पसरली जात आहे आणि यामुळेच आता हे जोडपे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचेएए म्हटलं जात आहे.
आणखी वाचा –