रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘पारु’ मालिकेमधील अहिल्यादेवी खऱ्या आयुष्यात दिसते अशी, कुटुंबातील मंडळींचा साधेपणाही कौतुकास्पद, फोटोंमध्ये दिसली झलक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 20, 2024 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Ahilyadevi Aka Mugdha Karnik

'पारु' मालिकेमधील अहिल्यादेवी खऱ्या आयुष्यात दिसते अशी, कुटुंबातील मंडळींचा साधेपणाही कौतुकास्पद, फोटोंमध्ये दिसली झलक

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. अल्पावधीतचं ही मालिका प्रेक्षकांच्या पसंती उतरली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात स्वतःच असं विशेष स्थान निर्माण केले आहे. मालिकेतील पारूची भूमिका अभिनेत्री शरयू सोनावणे साकारत आहे. तर आदित्यच्या भूमिकेत अभिनेता प्रसाद जवादे पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हेतर या मालिकेतील अहिल्यादेवी किर्लोस्कर या पात्रानेही प्रेक्षकांवर अक्षरशः जादू केली आहे. (Ahilyadevi Aka Mugdha Karnik)

मालिकेत अहिल्यादेवी हे पात्र जितकं कठोर आणि करारी वाटत आहे मात्र खऱ्या आयुष्यात या पात्राची एक वेगळीच बाजू आहे. अहिल्यादेवी किर्लोस्कर ही भूमिका मालिकेत अभिनेत्री मुग्धा कर्णिक साकारत आहे. करारी नजर, कठोर स्वभाव, एकचाली देहबोली ही अहिल्यादेवी यांच्या स्वभावाची वैशिष्ट्य आहेत, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मुग्धा कर्णिक हिने अहिल्यादेवी या पात्रातून प्रेक्षकांच्या मनात यशस्वी अशी छाप उमटवली आहे.

आणखी वाचा – भुवनेश्वरीचा अपमान होताच सून भडकली, अक्षराने उपस्थित महिलांना सुनावताच सासूच्या डोळ्यात अश्रू, आताही छळ करणार का?

View this post on Instagram

A post shared by Mugdha Karnik (@mugdha_karnik)

मालिकेत मुग्धा कठोर शिस्तबद्ध वाटत असली तरी प्रत्यक्ष जीवनात मात्र ती सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारी आहे. तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या स्वभावाची दखल घेणारे अनेक फोटो पाहायला मिळतील. पारू मालिकेत काम करण्याआधी मुग्धाने ‘झिम्मा’, ‘स्वाभिमान’, ‘होम स्वीट होम’ यांसारख्या मालिका, नाटक तसेच चित्रपटातून अभिनेत्री म्हणून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. आता मुग्धा अहिल्यादेवीच्या भूमिकेतून मालिकाविश्वात आपली छाप पाडण्यास सज्ज झाली आहे.

आणखी वाचा – “मंगळसूत्र न घातल्याने असं काय होणार आहे?”, मंगळसूत्र न घालण्यावरुन क्षिती जोगला सुनावल्यानंतर स्पष्ट उत्तर, म्हणाली, “खूप वायफळ वेळ…”

View this post on Instagram

A post shared by Mugdha Karnik (@mugdha_karnik)

याआधी मुग्धाने कधीही अहिल्यादेवी किर्लोस्करांसारखी कठोर अशी भूमिका साकारलेली नाही. मालिकेत अहिल्यादेवी किर्लोस्कर हे पात्र साकारताना मुग्धाचा पारंपरिक अंदाज प्रेक्षकांना अधिक भावतो. मात्र खऱ्या आयुष्यात मुग्धा खूपच ग्लॅमरस आहे. वेस्टर्न अंदाजातील मुग्धाचे अनेक फोटो सोशल मीडियावर आहेत ते फोटो पाहून ही खरंच अहिल्यादेवी आहे की काय?, हा प्रश्न पडतो. बरेचदा मुग्धा मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींसह वेळ घालवतानाही दिसली आहे. मुग्धा व क्षिती जोगची बरीच घट्ट मैत्री असलेली पाहायला मिळते. सोशल मीडियावर एकमेकींबरोबरचे त्या अनेक फोटो शेअर करत असतात.

Tags: Ahilyadevi Aka Mugdha Karnikmarathi actressmarathi serialmugdha karnikzee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Sandeep Khare told the emotional story of an old man see the details

"बायकोचं निधन झाल्यानंतरही रडलो नाही पण…", संदीप खरेंनी सांगितला 'त्या' व्यक्तीचा अंगावर काटा आणणारा प्रसंग, म्हणाले, "त्यांनी मला १० रुपये दिले तेव्हा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.