शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

भुवनेश्वरीचा अपमान होताच सून भडकली, अक्षराने उपस्थित महिलांना सुनावताच सासूच्या डोळ्यात अश्रू, आताही छळ करणार का?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 19, 2024 | 1:31 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada Promo

भुवनेश्वरीचा अपमान होताच सून भडकली, अक्षराने उपस्थित महिलांना सुनावताच सासूच्या डोळ्यात अश्रू, आताही छळ करणार का?

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत. मालिकेच्या कथानकाने या मालिकेला एक वेगळं वळण आलेलं पाहायला मिळत आहे. मालिकेतील अक्षरा व अधिपतीच्या जोडीवर प्रेक्षक खूप प्रेम करतात. अशातच मालिकेत सध्या रंजक वळण आलेलं पाहायला मिळत आहे. भुवनेश्वरीचं मनं वळविण्यात अक्षरा यशस्वी झाली आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये याची एक झलक पाहायला मिळाली. (Tula Shikvin Changlach Dhada Promo)

आजवर मालिकेत भुवनेश्वरीने मालिकेच्या अगदी पहिल्या दिवसापासून अक्षराचा रागराग केला. अक्षराबद्दल मनात राग ठेवून ती नेहमीच मालिकेत वावरताना दिसली. त्यामुळे अक्षरा कशी वर जाणार नाही याकडे भुवनेश्वरीच बारीक लक्ष असतं. अक्षराचा शिक्षणाकडे असलेला कल पाहता ती आपल्यापेक्षा वरचढ ठरू शकते. या भीतीने भुवनेश्वरीने कायमच अक्षराला शिक्षणापासून दूर ठेवलं. मात्र अक्षराने ही लढाई स्वतः पार करत तिची शिकवण्याची आवड जोपासली.

आणखी वाचा – अहिल्यादेवींचा बदलता अवतार, साखरपुड्यामध्ये दिशाला पारुची माफी मागायला लावणार, आदित्य-प्रितमलाही बसणार धक्का

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

अशातच एका स्पर्धेदरम्यान भुवनेश्वरीचा सत्कार होणार असतो. त्यावेळी काही महिला येऊन भुवनेश्वरी यांना चांगलंच सुनावतात. त्या महिलांपैकी एक बाई भुवनेश्वरी यांच्यावर चप्पल फेकून मारते. तितक्यात स्टेजवर उभी असलेली अक्षरा ती फेकलेली चप्पल पकडते. हे पाहून भुवनेश्वरीला खूप मोठा धक्का बसतो. अशातच आता मालिकेच्या नव्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. त्या महिलांच्या कृतीवर अक्षरा भडकलेली दिसत आहे. अक्षरा त्या महिलांची चांगलीच कानउघडणी करताना दिसत आहे.

आणखी वाचा – बहूचर्चित ‘द फॅमिली मॅन’ सीरिजच्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरुवात, कधी व कुठे पाहता येणार आगामी सीझन?, जाणून घ्या…

प्रोमोमध्ये अक्षरा असं बोलताना दिसत आहे की, “एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करणं, तिच्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणं हा तुम्हाला गुन्हा वाटतो का?, चारूहांस सूर्यवंशी म्हणजे माझे सासरे यांच्या बायकोच्या अधिकाराने नाही तर माझे पती अधिपती यांच्या आईच्या अधिकाराने ते या घरात राहतात. माझे सासरे जरी त्यांना बायको मानत नसले तरी अधिपतींनी त्यांना आई मानलं आहे”. हे पाहून भुवनेश्वरीच्या डोळ्यातही पाणी आलं आहे. सूनेने सासूची ठामपणे घेतलेली बाजू सर्वांनाच चकित करुन सोडते.

Tags: marathi serialtula shikvin changlach dhadaTula shikvin changlach dhada promozee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
raj kundra instagram post

“जेव्हा तुमचा अपमान होतो तेव्हा…”, ईडीच्या कारवाईनंतर शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची पोस्ट, म्हणाला, "ही प्रगती आहे आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.