Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अनुष्काच्या एण्ट्रीने आता किर्लोस्कर कुटुंबात वादळ येण्याची शक्यता वाढवली आहे. अनुष्काचं येणं जाणं वाढल्यानं आदित्यसाठी हिचं मुलगी पसंत करायची का असा प्रश्न अहिल्यादेवींना पडला आहे. मात्र, लग्नासाठी कोणतीही घाई न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. शिवाय आदित्यला जी मुलगी आवडेल त्याच मुलीशी मी तिचं लग्न लावून देईल असेही त्यांनी ठरवलं आहे, मात्र सतत अनुष्काचं येणं जाणं असल्याने आणि तिचं स्थळ आदित्यसाठी आल्यानं अनुष्काच या घरची सून होईल का असा प्रश्न साऱ्यांना पडलेला असतो.
शिवाय प्रिया श्रीकांत यांनी अनुष्काला तर आदित्यसाठी मुलगी म्हणून पसंत केलेलं असतं. मात्र आता इकडे आदित्यच लग्न ठरत असताना पारूचं काय होणार याची भीती पारू व सावित्रीला सतावताना दिसतेय. सावित्री पारूला वेळोवेळी सावध करताना दिसत आहे. मालिकेच्या अशातच समोर आलेल्या एका प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले. आणि या प्रोमो मध्ये पारू किर्लोस्कर कुटुंबापासून दूर गेलेली पाहायला मिळतेय. पारू आता या कुर्लोस्कर कुटुंबापासून खरंच दूर गेली असेल का?, ही चिंता साऱ्यांना सतावत आहे.
आणखी वाचा – Video : अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याला भेटला डीपी, व्हिडीओ कॉल करत हडळ आहेस म्हणत चिडवलं, मजेशीर व्हिडीओ समोर
मालिकेच्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, अनुष्का मीटिंगसाठी म्हणून किर्लोस्कर मेन्शनमध्ये आलेली असते. तेव्हा पारूच्या टॅलेंट बद्दल ती अहिल्यादेवींसमोर बोलते. पारू खूप हुशार मुलगी आहे आणि तुम्ही तिला ब्रँड अँबेसेडर करुन आणि या घरची नोकर करुन तिचं टॅलेंट रोखून ठेवलंय. ती पुढे बरंच काही करु शकते. बरंच काही स्वतः मिळवू शकते मात्र तिथपर्यंत तुम्ही तिला पोहोचू देत नाहीये. हे सारे ऐकल्याने अहिल्यादेवी फारच नाराज होतात आणि अनुष्काला ही सुनावतात. शिवाय शाळेचं कॉन्ट्रॅक्ट अनुष्काला द्यायचं नाही असंही त्या ठरवतात आणि अनुष्काला निघायला सांगतात.
आणखी वाचा – ‘शाका लाका बूम बूम’मधील संजूला लागली हळद, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
त्याच वेळेला त्या पारूलाही सांगतात की, आज पासून तुझा या घराशी आणि कंपनीशी कोणताही संबंध नाहीये. तू यापुढे कामावर नाही आलीस तरी चालेल. तुझा भविष्य घडवायचा मार्ग मोकळा आहे, हे ऐकताच पारूच्या डोळ्यात सुद्धा अश्रू येतात. तर इकडे आदित्य ही फार काळजी व्यक्त करत असतो. आदित्य पारूला विचारताना दिसतोय की, तू आता पुन्हा आमच्याकडे येणार नाहीस का?, यावर पारू आता काय उत्तर देणार, अनुष्कामुळे पारू किर्लोस्कर कुटुंबापासून दुरावणार का हे सारं पाहणं येणाऱ्या भागात रंजक ठरेल.