सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Lead Role च्या ऑडिशन्स दिल्या पण…; मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “देवाशी भांडलेले…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 10, 2026 | 10:31 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aditi Dravid Struggle

Lead Role च्या ऑडिशन्स दिल्या पण…; मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, "देवाशी भांडलेले…"

Aditi Dravid Struggle : कलाकार मंडळी कलाविश्वात काम मिळण्यासाठी बरीच धडपड करतात. बरेचदा ही मंडळी ऑडिशनसाठी वेळ घालवताना दिसतात. पण प्रत्येक ऑडिशनमधून त्यांना काम मिळेलच असं नाही. आणि म्हणूनच ते त्यांचे प्रयत्न करत असतात. बरेचदा सिलेक्शन न झाल्याने काहीसा त्यांचा हिरमोडही होतो. मात्र न खचता पुन्हा एकदा त्याचे जोमाने ही मंडळी त्यांचे प्रयत्न सुरु ठेवतात. काही वेळा देव परीक्षा घेतोय की काय असंही अनेकांना वाटत असतं. असंच काहीसं घडलं आहे अभिनेत्री अदिती द्रविडसह. अदितीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ऑडिशनबाबत भाष्य केलं. आजवर अदितीने अनेक मराठी मालिका, चित्रपट यांमध्ये काम केलं. आता अदिती ‘का रुसली रखुमाई’ या नाटकांतून रंगमंच गाजवताना दिसत आहे.

अदितीने ‘मज्जा पिंक’च्या ‘मनातला देव’ या पॉडकास्टला हजेरी लावली. यावेळी तिने अध्यात्माची बाजू सांगितली. तेव्हा बोलताना अदिती म्हणाली, “जेव्हा पहिल्यांदा ऑडिशनसाठी मला बोलावलं होतं, तर मी त्याच्या आधी पुण्यातून खूप नाटक, फिरोदिया, पुरुषोत्तम वगैरे सगळं करत होते. त्यामुळे त्या अनुषंगाने मी इथल्या लोकांना किंवा कास्टिंगच्या लोकांना माहिती होते. आणि त्यामुळे मला पहिल्यापासूनच ना, फॉर्च्युनेटली (टच वूड), खूप चांगल्या ऑडिशन्ससाठीच बोलावलं गेलं किंवा लीडच्याच ऑडिशनसाठी नेहमी बोलावलं गेलं. आणि आजपर्यंत माझं कधीच सिलेक्शन झालं नाहीये, कारण तुम्हाला माहितीये आतापर्यंतची माझी सगळी पात्रं जी मी साकारली आहेत ती प्रेक्षकांपुढे आहेत. पण राईट फ्रॉम माय फर्स्ट ऑडिशन टिल टुडे, मी दरवेळेला लीडसाठी ऑडिशन म्हणून मला बोलावतात, फायनल २ पर्यंत होते आणि माझं वर्कआउट होत नाही. त्यामुळे मी प्रत्येकवेळेला देवाशी भांडलेली आहे की यार, या वेळेस पण नाही झालं! म्हणजे बरं असं असतं की तुझं काम नाही आम्हाला आवडलं, तर पुढच्या वेळेला अजून चांगलं काम करून येता येईल”.

आणखी वाचा – “स्वतःच्या मुलाला पायावर उभं का नाही केलं?”, कॉमेडियनचा थेट अमिताभ बच्चनला सवाल, रोस्ट करणं पडणार महागात?

पुढे ती म्हणाली, “पण आता तू कॅरेक्टरला जात नाहीयेस, तू लूकला जात नाहीयेस. एका पॉईंटला मला कळलं की मी देवाशीही भांडणं चुकीचं आहे, कारण तो तरी कायच करणार आहे. त्याने मला एका विशिष्ट पद्धतीने बनवलेलं आहे. मी अशी आहे, मी छान दिसते जशी दिसते तशी. आता समोरच्याला मी कशी दिसायला हवीये, हे माझ्या हातात नाहीये आणि देवाच्याही हातात नाहीये. ते वन्स अँड फॉर ऑल त्याने एक बनवून पाठवलेलं आहे मॉडेल खाली, आता त्याच्यामध्ये काही होऊ शकत नाही. त्यामुळे आता माझी देवा सोबतची भांडणं खूप कमी झाली आहेत, कारण आता आम्ही… म्हणजे मी त्याला फक्त एक कॅज्युअली जाऊन सांगते की हॅलो, आज पण नाही झालं, इट्स ओके पण…”.

Tags: Aditi DravidAditi Dravid strugglemarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Next Post
Sushma Shiromani on rekha

'कुठं कुठं जायाचं हनिमूनला' गाण्यात रेखा कशी आली?, सुप्रसिद्ध दिग्दर्शिकेने सांगितलं खरं कारण, म्हणाल्या, " पैशाची…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.