Actor Kinshuk Vaidya Diiksha Nagpal Wedding : प्रसिद्ध टेलिव्हिजन मालिका ‘शका लाका बूम बूम’मधील संजूच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेला किंशुक वैद्य नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. २२ नोव्हेंबर २०२४ रोजी अभिनेत्याने त्याची गर्लफ्रेंड दीक्षा नागपाल हिच्याशी अलिबागमध्ये लग्न केले. विवाहित जोडप्यांचे पहिले फोटो आता समोर आले आहेत. या जोडप्याने त्यांचे कुटुंबीय व जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. सुमेध मुदगलकर, हिमांशू सोनी, हिबा नवाब, शाहीर शेख आणि अनेक कलाकार मंडळींनी किंशुकच्या लग्नाला हजेरी लावली होती.
लग्नासाठी किंशुकचा लूक खूप खास आहे. त्याने पगडीसह अप्रतिम पारंपरिक पोशाख परिधान केला होता यांत तो खूपच देखणा दिसत होता. तर दीक्षा महाराष्ट्रीयन वधूच्या लूकमध्ये लक्ष वेधून घेत आहे. बाकीच्या व्हिडीओमध्ये किंशुक त्याच्या लग्नाच्या मिरवणुकीमध्ये त्याच्या मित्रांबरोबर नाचताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये त्याचे मित्र सुमेध, शाहीर आणि सर्वजण वधूच्या स्वागतासाठी सज्ज असताना जोरदार डान्स करताना दिसत आहे.
आणखी वाचा – Video : अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याला भेटला डीपी, व्हिडीओ कॉल करत हडळ आहेस म्हणत चिडवलं, मजेशीर व्हिडीओ समोर
‘राधाकृष्ण’ फेम सुमेध मुदगलकरने त्याच्या इंस्टाग्रामवर किंशुक व दीक्षा यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्याने समारंभाच्या आतील काही व्हिडीओ देखील शेअर केले, ज्याने चाहते उत्साहित झाले. किंशुकच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ शेअर करताना सुमेधने लिहिले की, “लग्नाचे सीन वेडे करणारे आहेत”. किंशुक व दीक्षाबद्दल बोलायचे झाले तर, हे जोडपे काही काळ एकमेकांना डेट करत होते. दोघांनीही त्यांच्या प्रेमाची कबुली इंस्टाग्रामद्वारे दिली आणि त्याचे फोटो व्हायरल झाले. दीक्षा नागपाल व्यवसायाने कोरिओग्राफर आहे. दोघांच्या साखरपुड्याबद्दल बोलायचे झाले तर जवळचे कुटुंब आणि मित्रमंडळींमध्येही हा सोहळा पार पडला.
२००० साली सुरु झालेल्या मालिकेने सर्वच वयोगटातील प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. जादुई पेन्सिलच्या दुनियेत सगळ्यांचीच मन रमली जात होती. या मालिकेत मुख्य भूमिका सकारणारा संजू म्हणजेच किंशुक वैद्य हा चांगलाच चर्चेत राहिला. आता पुन्हा एकदा तो त्याच्या लग्न सोहळ्यामुळे चर्चेत आला आहे.