बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ गाण्यात रेखा कशी आली?, सुप्रसिद्ध दिग्दर्शिकेने सांगितलं खरं कारण, म्हणाल्या, ” पैशाची…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 10, 2026 | 11:30 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sushma Shiromani on rekha

'कुठं कुठं जायाचं हनिमूनला' गाण्यात रेखा कशी आली?, सुप्रसिद्ध दिग्दर्शिकेने सांगितलं खरं कारण, म्हणाल्या, " पैशाची…"

Sushma Shiromani on rekha : आज आपण पाहतो अनेक असे मराठी कलाकार आहेत जे मराठी सिनेविश्वासह हिंदी सिनेसृष्टीतही काम करतात. मात्र, असे बरेच हिंदीतील कलाकार आहेत ज्यांना देखील मराठी मध्ये काम करायची इच्छा असते, मराठीमध्ये काम करण्याची संधी मिळते. आज मराठी सिनेसृष्टीने इंडस्ट्रीत मिळवलेली जागा अनेकांच्या मनात घर करून आहे. त्यामुळे महाराष्ट्र मुंबईत राहणारे असे अनेक कलाकार आहेत जे मराठी भाषेच्या प्रेमापोटी मराठी सिनेमांत काम करण्यास सदैव तयार असतात. असंच काहीस घडलेलं अभिनेत्री रेखासह. ‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ या गाण्यात रेखाने मराठी लावणी करत अनेकांची मन जिंकली. मराठीत हे रेखाचं पहिलंच गाणं. दिग्दर्शिका, अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांनी रेखाला या गाण्यासाठी निवडलं. आणि या गाण्याने मराठी लावणी करत प्रसिद्धी मिळवली.

रेखा या गाण्यात कशी आली हा किस्सा सुषमा शिरोमणी यांनी ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या शोमध्ये सांगितला. त्या म्हणाल्या, “”मराठी मध्ये एक तर हनिमून शब्द आणणं म्हणजे मराठी गाण्यामध्ये इंग्लिश शब्द येणं हा फार मोठा एक चमत्कार होता. त्या काळात लोकांना असं वाटलं की, ‘कुठे कुठे जायाचं हनिमूनला’. हा हनिमून वर्ड एकदम कसा आला तर ती सुष्मा शिरोमणी आहे ना तिनी काहीतरी वेगळं केलं, स्वाभाविक आहे अगदी ते आहेच. मग असं झालं की या शब्दांना मॅच कोण करेल तर त्यावेळेस रेखा भयंकर पॉप्युलर होती एक तर ती सुंदर आणि म्हणजे तिच्याबद्दल जो ग्लमर होता तो खूप होता. त्यावेळेस तर तीच मॅच करु शकते. तर लकीली मी एका सिनेमामध्ये जस मी सांगितलं एका हिंदी चित्रपटाची ट्राईल म्हणून त्या रामगोपालजीने मोहन यांना ट्रायल बघायला बोलवलं. आणि त्यांनी ती ट्रायल पाहिल्यानंतर त्यांनी मला सावन भादों मध्ये त्यांच्या इकडे रेखाच्या मैत्रिणीचा रोल दिला आणि रेखाही काही नवीनच होती”.

आणखी वाचा – Lead Role च्या ऑडिशन्स दिल्या पण…; मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “देवाशी भांडलेले…”

पुढे त्या म्हणाल्या, “पहिला सिनेमा. हा आणि मी पण तशी नवीनच होते म्हणजे माझं काही तसं काही फार काम होतं असं काही नव्हतं पण तिची माझी चंगली मैत्री झाली. मग त्यावेळेस ज्या गोष्टी मला माहित नव्हत्या त्या ती माझ्याबरोबर डिस्कस करायची किंवा सांगायची. कालांतराने आमची मैत्री वाढत गेली. पण नंतर नंतर ती फार बिझी झाली आणि माझं काय तिच्याशी एवढं बोलणं नाही व्हायचं पण आजही मी तुम्हाला सांगते ती आज आम्ही समजा दोन वर्षात किंवा पाच वर्षात एकदा जरी बोलत असलो ना आमची मैत्री तीच आहे. मोहन यांचा पिक्चर करणं हे माझ्यासाठी फार मोठी सौभाग्याची गोष्ट झाली कारण त्यामुळे मला रेखाला आणता आलं आणि जेव्हा ती महबूब स्टुडिओमध्ये कोणाच तरी शूटिंग करत होते आणि आणि मी तिला भेटायला गेले. आणि ती मला जानू म्हणते कारण मोहन यांच्या पिक्चरमध्ये माझं नाव जानू होत तर ती अजूनही मला जानूच म्हणते. तर त्यावेळेस मी तिला म्हटलं की असं एक चित्रपटात गाणं आहे. नऊवारी साडी पहणने को मिलेगी नथ लगाने को मिलेगी वगैरे वगैरे सांगितलं. पण नऊवारी साडी नेसून, नथ घालून शूट करायला मिळणार याचा आनंद तिला अधिक झाला. तिला त्या महाराष्ट्रन गेटअपच एवढं कौतुक होतं जेवढं मला वाटत होतं की हिनी माझं गाणं करावं तेवढं कौतुकच झालं”.

आणखी वाचा – “मागचं वर्ष मेंटल हेल्थ फेजमध्ये होते”, अदिती द्रविडचा कठीण काळ, म्हणाली, “मी कधी बोलले नाही…”

शेवटी त्या म्हणाल्या, “आणि तुम्हाला खरं नाही वाटणार माझ्याकडून कधीही एक पैसा तिने घेतला नाही. तिने कधीच एक पैशाची मागणी केली नाही. राजकमल स्टुडिओमध्ये जेव्हा आम्ही सेट लावला त्याच्या दुसऱ्या दिवशीच महाराष्ट्र काही कारणास्तव बंद होता. तेव्हा मी रेखाला म्हटलं, यावर ती म्हणाली, ‘काहीच नाही मी आज रात्रीच स्टुडिओला येते म्हणजे उद्याच टेन्शन नाही’, हे इतकं कोण करणार?. आणि ते गाणं शूट झालं, आणि फार कमी वेळात त्या गाण्याला लोकप्रियता मिळाली”.

Tags: bollywood actressrekhaSushma Shiromani
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Anant Ambani Birthday

अनंत अंबानींच्या वाढदिवसाचा जल्लोष, बॉलिवूड जामनगरीत अवतरलं, रणवीर सिंग ते सलमान खान आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.