रविवार, मे 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अनंत अंबानींच्या वाढदिवसाचा जल्लोष, बॉलिवूड जामनगरीत अवतरलं, रणवीर सिंग ते सलमान खान आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 10, 2026 | 12:30 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Anant Ambani Birthday

अनंत अंबानींच्या वाढदिवसाचा जल्लोष, बॉलिवूड जामनगरीत अवतरलं, रणवीर सिंग ते सलमान खान आणि…

Anant Ambani Birthday : देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी शुक्रवारी १० एप्रिल रोजी त्याचा ३१वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास सोहळ्यासाठी शाहरुख खान, सलमान खान, रणवीर सिंग, संजय दत्त, रितेश देशमुख आणि शहनाज गिल यांच्यासह जवळपास संपूर्ण बॉलिवूडचे कलाकार जामनगर येथे पार्टीला पोहोचले आहेत. आता अनंतच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हर्षदीपने अनंतच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील फोटो शेअर केले आहेत. आधी ‘धुरंधर’ आणि आता ‘धुरंधर 2’ च्या यशाने खुश असलेला रणवीर सिंग जामनगरमध्ये खूप धमाल करत आहे. बुधवारी, जामनगर विमानतळावर पोहोचल्यानंतर अभिनेता आनंदाने पापाराझींसाठी पोज देत होता.

त्याच संध्याकाळी गायिका हर्षदीप कौरने एका कार्यक्रमातील रणवीरसोबतचा फोटो शेअर केला. अभिनेत्याचे कौतुक करताना हर्षदीपने लिहिले, “जेव्हाही मी या माणसाला भेटते तेव्हा तो सारखंच प्रेम आणि ऊर्जा दाखवतो. त्याची आभा, त्याचे प्रेम, त्याची मिठी… तुम्हाला खूप खास वाटते. एक खरा हिरा! लव्ह यू, रणवीर सिंग, तुमच्यासाठी आणखी शक्ती”. गायिका हर्षदीप कौरने तिच्या इंस्टाग्रामवर अनंत अंबानींच्या वाढदिवसाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. एका व्हिडीओमध्ये रणवीर मोहित चौहान आणि मनकित सिंगसोबत ‘डूबा डूबा रहाता हूं’वर डान्स करताना दिसत आहे.

आणखी वाचा – Lead Role च्या ऑडिशन्स दिल्या पण…; मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “देवाशी भांडलेले…”

View this post on Instagram

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

ए.आर. रहमानने जामनगरमध्ये अनंत अंबानींच्या भव्य वाढदिवसाच्या सोहळ्यालाही हजेरी लावली आणि कार्यक्रमात परफॉर्मही केला. यावेळी त्याने जांभळा कुर्ता आणि पांढरी पँट परिधान केली होती. तर हर्षदीप हिरव्या रंगाच्या सूटमध्ये खूपच सुंदर दिसत होता. सलमान खान जामनगरला पोहोचला तेव्हा त्याचा नवा लूक दिसला, तर त्याची बहीण अर्पिता खान आणि मेहुणा आयुष शर्मा यांनीही सेलिब्रेशनला हजेरी लावली. शाहरुख खानही पत्नी गौरी खान आणि मुलगा अबराम खानसोबत या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होत आहे.

आणखी वाचा – ‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ गाण्यात रेखा कशी आली?, सुप्रसिद्ध दिग्दर्शिकेने सांगितलं खरं कारण, म्हणाल्या, ” पैशाची…”

View this post on Instagram

A post shared by Mankeet Singh (@mankeet_singh)

राधिका मर्चंटने पती अनंत अंबानी यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. व्हायरल होत असलेल्या एका आतल्या व्हिडीओमध्ये राधिका अनंतला मिठी मारून त्याच्या गालावर किस करताना दिसत आहे. अनंत आनंदाने राधिकाचा हात धरताना दिसत आहे. यावेळी तेथे उपस्थित असलेले लोक या जोडप्यावर गुलाबाच्या फुलांचा वर्षाव करताना दिसत आहेत.

Tags: ambani familyanant ambaniranveer singh
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
Divyanka Tripathi Vivek Dahiya IVF controversy

IVF च्या खोट्या बातम्यांवर भडकलं सुप्रसिद्ध जोडपं, लग्नाच्या १० वर्षांनी होणार आहेत पालक, म्हणाले, "आम्हाला विचारा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.