Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे अनुष्का किर्लोस्कर यांच्या घरी आलेली असते. तेव्हा अनुष्का तिच्या कुटुंबाबाबत भाष्य करताना थोडीशी भावुक होते. त्यावेळेला किर्लोस्कर कुटुंबातील सगळेचजण तिला धीर देताना दिसतात. तर पारू तिला गेस्ट रूममध्ये घेऊन येते आणि तिला फ्रेश व्हायला सांगते. टॉवेल नसल्याने पारू टॉवेल आणायला जाते इतक्यातच तिथे आदित्य येतो. अनुष्काला रडताना पाहून आदित्यला फार वाईट वाटतं. तेव्हा आदित्य स्वतःचा रुमाल काढून अनुष्काला देतो आणि अनुष्काची समजूत घालतो. शिवाय अनुष्काचं भरभरुन कौतुकही करतो. तू अगदी माझ्या आईसारखीच आहेस. तिच्यासारखे तुझे हावभाव, बोलणं सगळं काही असल्याचं तो म्हणतो.
यावर अनुष्का गमतीत म्हणते की, ‘आदित्य तु मला मॉम तर म्हणून आवाज नाही देणार ना’. यावर दोघेही हसू लागतात. हे सगळं काही दामिनी बाहेरुन पाहत असते. तितक्यात पारू येते तेव्हा दामिनी पारुला अडवते आणि सांगते की, ‘ते दोघं चांगल्या गप्पा मारत आहेत हे तुला पाहवत नाहीये का, तू त्यांच्यामध्ये जाऊन काय करणार आहेस’. यावर पारू सांगते की, ‘मी तर अनुष्का मॅडमना टॉवेल द्यायला जात होते’. यावर दामिनी सांगते की, ‘त्या टॉवेलची आता काहीच गरज नाहीये कारण आदित्यने स्वतःचा रुमाल अनुष्काला दिलेला आहे’. त्यानंतर अनुष्का घरी जायला निघते. तेव्हा आदित्य तिला गाडीपर्यंत सोडायला येतो. तिथे मारुतीदेखील उभा असतो. मारुतीला पाहून अनुष्का त्याची माफी मागते आणि सांगते की, ‘मी काल तुम्हाला तसं बोलायला नको हवं होतं. तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहात आणि मुळात तुम्ही पारूचे वडील आहात’. हे ऐकल्यावर मारुती हात जोडतो.
यावर अनुष्का मारुतीला ‘हात जोडू नका’, असं सांगते. त्यानंतर आदित्य सांगतो की, ‘हे पारूचे वडील असले तरी हे सगळ्यात आधी माझे मारुती मामा आहेत आणि अहिल्या देवींचे भाऊ आहेत. आई यांना राखी सुद्धा बांधते’. हे ऐकल्यावर अनुष्का मारुतीच्या पाया पडते. आणि त्यांचा आशीर्वाद घेते. त्यानंतर मारुतीला आदित्य सांगतो की, ‘यांना सोडायला मी जात आहे त्यामुळे तुम्ही घरी जाऊन आराम करा’. आणि आदित्य अनुष्काला सोडायला जातो. वाटेत जात असतानाच एक गजरा घेऊन छोटी मुलगी आदित्यला विनंती करताना दिसते. त्यावर ते दोन गजरे आदित्य घेतो आणि म्हणतो की, ‘मी हे गजरे पारूला देईल’.
यावर अनुष्का आदित्यला टोकते की, ‘यापुढे तुला जेव्हा केव्हा मला गजरा घ्यावासा वाटेल तेव्हा घे. आता हा गजरा मला नको आहे’. त्यानंतर आदित्य पारूजवळ येतो आणि गजरा देतो. तो गजरा पाहून पारू खूपच खुश होते. मालिकेच्या पुढील भागात अहिल्यादेवी पारूच्या केसातील गजरा पाहून सगळ्यांसमोर विचारतात की, ‘खूप सुंदर सुगंध पसरला आहे. हा गजरा तुला कोणी दिलाय?’, आता पारू यावर काय उत्तर देणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.