मराठी मनोरंजन विश्वात सध्या लग्नसराईला सुरुवात झाली आहे. अनेक कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकत आहेत. अशातच आता रेश्मा शिंदेही लग्नबंधनात अडकणार आहे. रेश्मा हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. रेश्मा लवकरकच तिच्या एका नव्या आयुष्याला सुरुवात करणार असल्याचं समजत आहे. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील कलाकारांनी रेश्माचं केळवण मोठ्या थाटामाटात पार पाडलं. हर्षदा खानविलकर, ऋतुजा बागवे, शाल्मली टोळ्ये, अनघा भगरे, सुयश टिळक, आशुतोष गोखले, विदिशा म्हसकर, अनुष्का पिंपुटकर, अंबर गणपुळे या कलाकारांनी रेश्माचं केळवण साजरं केलं. (reshma shinde kelvan)
‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या संपूर्ण टीमने रेश्माचं पहिलं केळवण साजरं केलं असून या केळवणाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे रेश्माने तिच्या ठरलेल्या लग्नाची बातमी अशाप्रकारे चाहत्यांना दिली आहे. रेश्माने आजवर कधीच तिच्या प्रेमाबद्दल किंवा लग्नाबद्दल भाष्य केलं नव्हतं. त्यामुळे सोशल मीडियावरील तिच्या केळवणाचे फोटो पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. केळवणाच्या या फोटोत रेश्मानं हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली असून गळ्यात हिऱ्यांचा नेकलेस घातला आहे
आणखी वाचा – 21 November Horoscope : मेष, सिंह व कुंभ राशीच्या लोकांना गुरुवारी व्यवसायात होणार आर्थिक लाभ, जाणून घ्या…
‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली रेश्मा सध्या स्टार प्रवाहवरीलच ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. दरम्यान, रेश्च्यामाच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता तिचा होणारा नवरा नक्की कोण आहे? याची सर्वांना उत्सुकता आहे. रेश्माच्या अनेक चाहत्यांचे आता याकडे लक्ष लागून राहिलं आहे. त्याचबरोबर ती लग्नबंधनात कधी अडकणार? याचीही चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
दरम्यान, रेश्माने ‘लगोरी -मैत्री रिटर्न्स’ या मालिकेतून टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर अनेक मालिकांमध्ये ती दिसली. मग स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने रेश्माला चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेत तिने दीपा ही भूमिका साकारली होती. आता सध्या ती ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.