Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अहिल्यादेवी हल्ल्याबाबत विचार करत असतात तेव्हा श्रीकांत येऊन अहिल्यादेवींची समजूत काढतो. मात्र, अहिल्यादेवी या हल्ल्याबाबत पुन्हा एकदा काळजी व्यक्त करताना दिसतात. हल्ल्यावरील संकट टळलं असलं तरी हे संकेत विसरुन चालायचं नाही त्यामुळे मला आता काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे असेही अहिल्यादेवी म्हणतात. तर इकडे सगळेजण जमलेले असतात तेव्हा अहिल्यादेवी प्रिया व प्रीतमला त्यांच्या कामाबद्दल विचारतात आणि काम कुठवर आलं आहे याबद्दल विचारतात. तेव्हा प्रिया सांगते की, आर्किटेक्चरची अपॉइंटमेंट मिळत नसल्याने गोष्टी पुढे सरकत नाहीयेत.
त्यावेळेला अहिल्यादेवी यात स्वतः लक्ष घालतात आणि आदित्यला ही फोन करुन याबाबत विचारपूस करायला सांगतात. अहिल्यादेवी थेट आर्किटेक्चरच्या ऑफिसला जाण्याचं ठरवतात. तर इकडे दिशा जेलमध्ये आरडाओरडा करत असते तेव्हा एक पोलीस येतात आणि त्या पोलिसांना लालच देऊन ती पोलिसांकडून फोन घेते आणि त्या पोलिसांच्या फोनवरुन ती वकिलाला फोन लावते आणि विचारते, ‘ती मला सोडवायला येणार होती ती कुठे आहे?’. यावर वकील एकच उत्तर देतात की, ‘ती आता येणार नाही त्यामुळे तुम्ही तिची वाट बघू नका’. हे ऐकल्यावर दिशा हताश होते आणि जोर जोरात रडू लागते.
आणखी वाचा – घरात घालायचे कपडे व मॅक्सी फक्त १५० रुपयांपासून उपलब्ध, सगळ्यात मोठी साइजही सहज मिळणार, नक्की ठिकाण कोणतं?
तर अहिल्यादेवी आर्किटेक्चरच्या ऑफिसमध्ये पोहोचलेल्या असतात तेव्हा ती आर्किटेक्चर तिथल्या स्टाफचा वाढदिवस साजरा करत असते. स्टाफबरोबरची वागणूक, ऑफिसचं वातावरण पाहून अहिल्यादेवी खूपच इंप्रेस होतात. तर इकडे रिसेप्शनिस्टकडे चौकशी केल्यावर कळतं की, आज मॅडम कोणतीही अपॉइंटमेंट घेणार नाही आहेत आणि त्या एक्झिबिशनला गेल्या आहेत. यावर अहिल्यादेवी आदित्यला फोन करुन सगळं काही सांगतात. त्यानंतर आदित्य त्या एक्झिबिशनची माहिती काढतो. तिथला पत्ता काढतो आणि अहिल्यादेवी सह तिथे पोहोचतो. या वेळेला प्रिया व दामिनीसुद्धा आदित्य बरोबर जाण्याचं ठरवतात. तर प्रीतम घरी ऑफिसचं काम करत असतो. त्याच वेळेला श्रीकांत तिथे येतो तेव्हा नखं कापता कापता श्रीकांतचं बोट कापलं जातं. तेव्हा पारू त्यावर मलमपट्टी करते.
आणखी वाचा – नवज्योत सिंग सिद्धू यांनी ‘द कपिल शर्मा शो’ का सोडला? पाच वर्षांनी सांगितले नेमकं कारण, म्हणाले, “राजकीय…”
मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, प्रीतम पारुला आठवण करुन देतो की, जेव्हा मला आणि प्रिया मॅडमला एकत्र आणण्यासाठी आपण गावी होतो तेव्हा दादाची बायको म्हणून आणि माझी वहिनी म्हणून तु खूप चांगली काळजी घेतलीस हे तुला आठवतंय की नाही आणि त्यानंतर घरात सगळेच जण आलेले असतात. तेव्हा मोहन, श्रीकांत, प्रीतम सगळेजण आदित्यला चिडवत असतात आणि सांगतात की, त्या एक्झिबिशनला आदित्यला एक मुलगी आवडली आहे म्हणूनच त्याच्या गालावर लाली चढली आहे. आता आदित्य त्या मुलीच्या खरंच प्रेमात पडला असेल का?, पारू पासून तो वेगळा होईल का?, ती मुलगी नेमकी आहे तरी कोण?, दिशाला मदत करणारी तीचं मुलगी असेल का?, हे सारं पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.