महिला म्हंटल्या की कपड्यांचा विषय हा आवर्जून निघतो. कपड्यांची निवड करताना महिला फार विचार करतात. कोणता कपडा असावा? डिझाईन कशी असावी? कोणत्या कार्यक्रमासाठी कोणते कपडे घालावेत? असे अनेक विचार प्रत्येक महिलेच्या डोक्यात नेहमी फिरत असतात. अशातच महिलांचा एक आवडता प्रकार म्हणजे घरात घालण्याचा गाऊन ज्याला मॅक्सी असेही म्हणतात. मॅक्सीची निवड करताना महिला या अत्यंत काटेकोर असल्याचेदेखील बघायला मिळते. मग त्यामध्ये दिवसा घरी घालायची मॅक्सी कशी असावी? आणि रात्री झोपताना मॅक्सी कशी असावी? असाही विचार केला जातो. त्यामुळे महिलांना सुटसुटीत, स्वस्त दरात तसेच सुंदर अशा मॅक्सी कुठे मिळू शकतील? हे आपण आता जाणून घेऊया. (Pure Cotton Maxis in Budget)
काळानुसार मॅक्सीमध्येदेखील अनेक प्रकार पाहायला मिळतात. पण ते सगळ्यांना परवडतील व हव्या त्या साईजमध्ये भेटतील असे नाही. पण मुंबईमध्ये असे ठिकाण आहे जिथे महिलांना सगळे पर्याय उपलब्ध होतील. ‘दिव्या प्रिंट्स’ हे दादर पूर्व येथील हिंदमाता येथे गाऊन/मॅक्सीचे दुकान असून या ठिकाणी १५० रुपयांपासून मॅक्सी मिळण्यास सुरवात होते. तसेच लहान साईजपासून ते अगदी 7XL पर्यंत या ठिकाणी मॅक्सी उपलब्ध आहेत. तसेच या ठिकाणी होलसेल कपडे मिळत असून सिंगल पीसदेखील खरेदी करु शकतो.
तसेच या गाऊन/मॅक्सीच्या कापडाच्या क्वालिटीबद्दल सांगायचे झाले तर, पॉलिस्टर कॉटन, प्यूअर कॉटन अशा कपड्याच्या मॅक्सीदेखील आहेत. प्यूअर कॉटनचे गाऊन १८० रुपयांपासून मिळू शकतील. तसेच सगळे रंगदेखील खूप आकर्षक आहेत. तसेच यामध्ये विविध प्रिंट व पॅटर्नदेखील मिळतील. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रीमियम क्वालिटीचे गाऊनदेखील मिळतील. ज्याची किंमत २५० रुपायांपासून सुरु होते. तसेच अजून चांगल्या क्वालिटीचे आणि थोडे महाग गाऊन घ्यायचे असेल त्याची किंमत ३५० रुपयांपासून सुरु होते.
त्यामुळे तुम्हाला स्वतःला गाऊन/मॅक्सी घ्यायची असेल किंवा तुमच्या घरातील आई, आजी, बहीण, आत्या, मामी, काकी कोणालाही द्यायची असेल तर तुम्ही या दुकानातून खरेदी करु शकता किंवा होलसेलमध्ये खरेदी करुन स्वतःचा छोटा व्यवसायदेखील सुरु करु शकता.