Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, आता अखेर अहिल्यादेवींच्या इच्छेनुसार प्रीतम व दिशा यांचं लग्न लागणारच असतं. तर प्रियाच्या वडिलांनी म्हणजेच आबासाहेबांनी विरोध केल्यामुळे प्रीतम मुंबईला निघून आलेला असतो. इकडे अहिल्यादेवींनी त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु करुन ठेवलेली असते, त्यानुसार अहिल्यादेवी हळदीची तयारी करतात. प्रीतमला हळदही लागायला सुरुवात होते, तेव्हा दिशा तिच्या बॉयफ्रेंडला बाहेर भेटायला गेलेली असते. तितक्यात पारू तिच्या घरी दिवाबत्ती करण्यासाठी जात असते तेव्हा पारू दिशाला त्या मुलाबरोबर रेड हँड पकडते.
मात्र दिशा त्या वेळेला काहीच बोलत नाही आणि तिथून निघून जाते. त्यानंतर पारू ही गोष्ट आदित्यला सांगायचं ठरवते, आदित्यच्या रूम मध्ये येत ती आदित्यला सांगते की, मी दिशा मॅडमना आता एका मुलाबरोबर बाहेर पाहिलं. हळदी समारंभाचा कार्यक्रम उरकतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पारू व आदित्य बोलत असतात की, काही झालं तरी आज प्रीतम सरांचं आणि दिशा मॅडमचं लग्न होता कामा नये. हे लग्न न होण्यासाठी आपल्याला काहीतरी सुचवावच लागेल, तेव्हा आदित्य पारूला सांगतो की, तुला काही सुचतंय का तर बघ. आदित्यच्या लक्षात येतं की प्रीतम काही दिवसांपूर्वी सांगत होता की, दिशाचं बाहेर कुठेतरी प्रेम प्रकरण आहे.
तिचं कोणत्यातरी मुलावर प्रेम आहे, हे ऐकल्यावर पारूला घाम फुटतो, तेव्हा पारू सांगते, मला सुद्धा याबाबत माहित आहे. मी सुद्धा त्यांना एकत्र पाहिलं आहे. त्यानंतर पारू आदित्यला सगळं काही खरं खरं सांगते. एकीकडे अहिल्यादेवी व सयाजी म्हणजेच आबासाहेबांमध्ये वीस वर्षांपूर्वी नेमकं असं काय घडलेलं याची उत्सुकता साऱ्यांनाच लागून राहिलेली आहे. दोघांमधील बहिण भावाचं हे नातं कसं संपलं हे जाणून घेणे प्रेक्षकांनाही रंजक ठरतेय.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi मधून आणखी एक जण घेणार निरोप, कोण असेल हा सदस्य? ‘या’ स्पर्धकाच्या नावाची चर्चा
अशातच मालिकेच्या प्रोमोने साऱ्यांचे लक्ष वेधले, मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, अहिल्यादेवीना थेट पारूच विचारते, तुमच्या दोघांमध्ये असं काय झालं होतं ज्यामुळे तुमच्या नात्यात दुरावा आला?, आता अहिल्यादेवी पारुला या नात्यात आलेल्या दुराव्या बद्दल सांगणार का?, हे पाहणं रंजक ठरेल.