गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi मधून आणखी एक जण घेणार निरोप, कोण असेल हा सदस्य? ‘या’ स्पर्धकाच्या नावाची चर्चा

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 4, 2024 | 10:10 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 new promo Abhijeet, Ankita, Suraj, Nikki, Dhananjay and Janhavi another one is about to end their journey.

Bigg Boss Marathi 5 मधील अभिजीत, अंकिता, सूरज, निक्की, धनंजय आणि जान्हवी या सहा जणांपैकी आणखी एकाचा प्रवास संपणार आहे.

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझनची सध्या जोरदार चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. या घरातील एकूण १६ जणांच्या प्रवासाने सुरुवात झाली होती आणि आता प्रवास अवघ्या ६ जणांपर्यंत येऊन पोहोचला आहे. गुरुवारी पार पडलेल्या मिड वीक एलिमिनेशनमध्ये सिनेविश्वातील दिग्गज अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचा प्रवास संपला. तब्बल ६७ दिवसांनी वर्षा यांनी घराचा निरोप घेतला. ‘बीबी हाऊस पार्टी’ सुरु असताना ‘बिग बॉस’ने सर्वांना मोठा धक्का दिला. मिडवीक एलिमिनेशन जाहीर करून ‘बिग बॉस’ने पाचव्या पर्वातील टॉप ६ स्पर्धकांच्या नावांची घोषणा केली आणि वर्षा उसगांवकर यांचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला. (Bigg Boss Marathi 5 New Promo)

वर्षा उसगांवकर यांनी शोचा निरोप घेतल्यानंतर ‘बिग बॉस मराठी ५’ शोला टॉप ६ स्पर्धत मिळाले आहेत. अभिजीत, अंकिता, सूरज, निक्की, धनंजय आणि जान्हवी… अशातच आता या सहा जणांपैकी आणखी एकाचा प्रवास संपणार आहे. ‘बिग बॉस’च्या शेवटच्या स्पर्धेत एकूण पाच जणांचा समावेश होतो. त्या निकषांनुसार या घरातील आणखी एक जण निरोप घेणार आहे आणि याचा एक प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – मोठा धक्का! Bigg Boss Marathi मधून वर्षा उसगांवकर घराबाहेर, सदस्यांनाही झटका, नक्की कुठे चुकलं?

कलर्स मराठीकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या नवीन प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ असं म्हणतात की, “‘बिग बॉस मराठी’च्या या सीझनचे टॉप ६ मी जाहीर केले आहेत. पण इथेच येतो आहे एक  ट्विस्ट. त्यामुळे आता आपल्याला कळेल कोण आहेत टॉप ५”. ‘बिग बॉस’च्या या उद्घोषणेमुळे जाहीर आहे की एक जण या घरातून निरोप घेणार आहे. त्यामुळे आता जान्हवी, निक्की, अभिजीत सूरज अंकिता आणि धनंजय यांपैकी कुणाचा प्रवास संपणार यासाठी उत्सुकता लागून राहिली आहे.

आणखी वाचा – लाभले आम्हांस भाग्य…; मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळताच कलाकारांनी व्यक्त केला आनंद, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार

दरम्यान, जुलै महिन्यात ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला अगदी दणक्यात सुरुवात झाली होती. टीआरपीमध्येही हा कार्यक्रम अव्वल ठरला होता. तर नॉन-फिक्शन कार्यक्रमांमध्ये सर्वाधिक पाहिला जाणारा शो म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले गेले. अशातच आता हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. १०० दिवसांऐवजी ७० दिवसांत हा शो संपणार आहे. येत्या ०६ ऑक्टोबर रोजी या शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे.

Tags: Bigg Boss Marathi 5 Marathi NewsBigg Boss Marathi 5 NewsBoss Marathi 5
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Virat Kohli Fitness
Lifestyle

वाढतं वजन, धावायलाही अवघड, स्वतःचीच लाज वाटू लागली अन्…; विराट कोहलीने असं कमी केलं वजन

मे 15, 2025 | 7:00 pm
navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Next Post
Paaru Marathi Serial Update

Paaru Marathi Serial : २० वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?, अहिल्यादेवींचा भूतकाळ येणार समोर, उत्सुकता वाढली

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.