Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे प्रीतम व दिशा यांच्या लग्नाचा दिवस आलेला असतो. तर आदित्यने पारुला अहिल्यादेवी व आबासाहेबांना एकत्र आणण्यासाठी, त्यांच्यातील दुरावा संपवण्यासाठी पुन्हा गावाकडे पाठवलेलं असतं. पारू गावाकडे जायला निघते. तितक्यातच आबासाहेब प्रिया व दादासाहेबांना घेऊन देव दर्शनाला जात असतात, मध्येच गाडी थांबवत पारू त्यांना थांबवते. त्यावर आबासाहेब फार चिडतात आणि म्हणतात, तू इथे का आली आहेस?. त्यानंतर पारू सांगते की, मला या नात्यातला दुरावा संपवायचा आहे मी इथे नाती जोडायला आले आहे. आबासाहेबांचा झालेला अपमान पाहून प्रिया देखील पारूवर चिडते, मात्र पारू सांगते की, सत्य काय आहे ते तुमच्यासमोर यायलाच हवं.
वीस वर्षांपूर्वी नेमकं काय घडलेलं हे तुम्हाला कळायलाच हवं असं सांगते. आबासाहेबांसमोर वीस वर्षांपूर्वी घडलेली घटना डोळ्यासमोरुन जाते. अहिल्या व प्रताप हे गाव सोडून मुंबईला का गेले याची एक झलक त्यांच्या डोळ्यासमोर येते. त्यानंतर आबासाहेब रागा रागातच पारुला म्हणतात की, तुला अहिल्याने इथे माझी वकिली करायला पाठवलं आहे का?, असं असेल तर तू आत्ताच इथून निघून जा. माझं काही मन धजावणार नाही. हे ऐकल्यावर पारू सांगते की, तुम्हाला तुमच्या बहिणीबद्दल काय माहिती आहे. आजही पुन्हा तुम्ही एकदा माणसं ओळखायला चुकला आहात. तुमच्या बहिणीने हे गाव का सोडलं होतं हे तुम्हाला माहित तरी आहे का?, असं म्हणत पारू सर्व काही खरं खरं सांगायला सुरुवात करते.
तेव्हा पारू सांगते की, तुमच्या पत्नीचं निधन झालं त्याच्यानंतर इथे गावात डॉक्टर नव्हते, शाळा नव्हत्या, कॉलेज नव्हतं, कसली सोय नव्हती ही सोय या गावात व्हावी असं तुमचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहिल्यादेवी मुंबईला गेल्या. इथे राहून ते स्वप्न पूर्ण करणे त्यांना शक्यच नव्हतं. हे ऐकल्यावर आबासाहेब विचारतात पण अहिल्याने असं काय केलं जे या गावासाठी फायद्याचं ठरलं. या गावासाठी मी मरमर मेलो. एस फाउंडेशनची मला या गावासाठी खूप मदत झाली. एस फाउंडेशनने मिळून मला यात मदत केली. कर्ज दिलं आणि म्हणून मी हे सगळं काही करु शकलो. अहिल्या यात कुठेच नव्हती. हे ऐकल्यावर पारू पारू म्हणते की, एस फाउंडेशन हे कोणाचं आहे याचा तुम्ही एकदा विचार तरी केला का? किंवा तुम्ही कोणाला याबद्दल विचारलं तरी का?. त्यावर आबासाहेब नाही असं म्हणतात. तेव्हा पारू सांगते की, एस फाउंडेशन म्हणजेच सयाजीराव फाउंडेशन हे माझ्या देवी आईच फाउंडेशन आहे आणि तिने तुम्हाला या सगळ्यासाठी मदत केली आहे. तेव्हा दादासाहेब विचारतात, मग ती इकडे गावाकडे पुन्हा का नाही आली?.
यावर पारू उत्तर देत म्हणते की, कारण तिच्या भावाने तिला शपथ घातली होती की तू पुन्हा मला तुझं तोंड दाखवलं तर त्या दिवशी माझा शेवटचा दिवस असेल आणि या शपथेपोटी त्या वीस वर्ष गावाबाहेर मुंबईत राहतात. हे ऐकून आबासाहेब शांतच होतात. आता आबासाहेब त्यांच्या बहिणीला म्हणजेच अहिल्यादेवींना भेटायला पुन्हा मुंबईत जाणार का? शिवाय पारूने सांगितल्याप्रमाने प्रीतम व प्रियाचं लग्न व्हायला हवं कारण प्रीतम सारखा मुलगा प्रियाला पुन्हा मिळणार नाही, असं सांगितलेलं असतं. त्यामुळे आता आबासाहेब स्वतःच जाऊन प्रिया व प्रीतमच लग्न लावणार का?, हे सारं पाहणं मालिकेत रंजक ठरतंय.