ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त, टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांचे बुधवारी ९ ऑक्टोबर रोजी झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी टाटांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकाली निधनाने संपुर्ण भारताला मोठा धक्का बसला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला रक्तदाबात अचानक घट झाल्यामुळे त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी ते रुटीन चेकअप साठी रुग्णालयात दाखल झाले असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून त्यांच्या निधनामुळे एक पोकळी निर्माण झाली आहे. (Ratan Tata Death)
टाटांच्या अचानक निघून जाण्याने राजकीय मनोटरंजन क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. देशाला आकार देणारे त्यांचे नेतृत्व, मूल्ये आणि योगदानाचे स्मरण करून अनेक सेलिब्रिटींनी या महान व्यक्तीला मनापासून श्रद्धांजली वाहिली आहे. अनुष्का शर्मा, सुश्मिता सेन, सलमान खान, अजय देवगण, राणा डग्गुबत्ती, प्रियांका चोप्रा जोनस, संजय दत्त, वरुण धवन, रोहित शेट्टी, वाणी कपूर, आयुष्मान खुराना, संजय दत्त, पुलकित सम्राट, शर्वरी वाघ, डेझी शाह, भूमी पेडणेकर आणि अथिया शेट्टी अशा अनेक कलाकारांनी टाटांना श्रद्धांजली वाहिली आहे.
आणखी वाचा – नवरात्रीच्या आठव्या दिवशी मेष, कर्क आणि मिथुन राशीच्या लोकांची होणार इच्छापुर्ती, जाणून घ्या…
मराठी कलाविश्वातूनदेखील रतन टाटांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला जात आहे. प्रसाद ओक, कुशल बद्रिके, सुबोध भावे, सलील कुलकर्णी, भाग्यश्री मोटे, रितेश देशमुख, जिनीलिया देशमुख, रवी जाधव आणि अशा अनेक कलाकारांनी टाटांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘असा माणूस होणे नाही’, “लवकर निघून गेलात सर’, ‘एका युगाचा अंत झाला आहे’, तुमची कमी नक्कीच जाणवेल’, अशा शब्दांत कलाकारांनी रतन टाटांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली आणि आदरांजली वाहिली आहे.
आणखी वाचा – “शाळेची आवड नव्हती पण…”, सूरजच्या शिक्षकांनी सांगितलं त्याचं शालेय जीवन, म्हणाले, “मस्तीखोर मुलांबरोबर फिरायचा आणि…”
दरम्यान, देशात उदारीकरण आणि खासगीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतर रतन टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली या समूहाने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आपली छाप सोडली आहे. रतन टाटा हे केवळ त्यांच्या व्यावसायिक कौशल्यासाठीच नव्हे तर परोपकार आणि नैतिक नेतृत्वासाठी त्यांच्या वचनबद्धतेसाठीही ओळखले जात होते.