दोन दिवसांपूर्वी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचवा सीझनचा विजेता घोषित झाला. त्यामुळे सध्या सूरज चव्हाणची चांगलीच चर्चा आहे. माध्यमांशी संवाद झाल्यानंतर सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत यांनी श्रीसिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर तो बारामतीत पोहोचला. तिथेही त्याचे अगदी जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्याच्यासाठी मोठा हार मागविण्यात आला होता. गावी पोहोचल्यानंतर सूरजने गावातील शाळेला भेट दिली असून यावेळी शाळकरी मुलांना मोलाचा सल्ला दिला आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (Suraj Chavan School Life)
सूरज मंगळवारी संध्याकाळी त्याच्या मोढवे गावात पोहोचला. यावेळी त्याच्या स्वागतासाठी गावात जय्यत तयारी करण्यात आली होती. गुलालाची उधळण करून गावकऱ्यांनी सूरजची विजयी मिरवणूक काढली. सूरज गावी गेल्यावर आधी तो त्याच्या शाळेत गेला आणि तिथे विद्यार्थ्यांना त्याने ‘भरपूर शिका, मागे पडू नका’, असा मोलाचा सल्ला दिला. कारण परिस्थितीमुळे शाळा न शिकू शकलेला सूरज शिक्षणाचे महत्त्व जाणतो आणि हेच महत्त्व जाणून त्याने सर्वांना शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात सूरजचे शिक्षक त्याच्याबद्दल सांगत आहेत.
आणखी वाचा –
सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमध्ये शिक्षक सूरजविषयी असं म्हणतात की, “सूरज हा कधीच ११ ते ०५ शाळा करत नव्हता. आम्ही त्याच्या घरी जायचो. त्याला घेऊन यायचो. आमची कुठे चाहूल लागली तर आम्हाला तो सापडत पण नव्हता. लपून बसायचा किंवा भिंतीवरुन उडी मारुन वगैरे जायचा. परंतू, प्रत्यक्षात कधी समोर आला तर तो आम्हाला “सर मी तुमच्याबरोबर नाही येत. मी उद्या येतो” असं म्हणायचा. त्याची शाळा शिकण्याची इच्छा नसायचीच. तो खूप खेळकर होता. त्याला गोट्या, विटी दांडू, हे खेळ खेळायचा आणि मस्तीखोर मुलांबरोबर फिरायचा. ओढ्यावर फिरणे, पक्षी बघणे यातच तो रमायचा. शाळेचे आवड त्याला कमीच होती. पण त्याच्या ज्या बाहेरच्या आवडी होत्या, त्यातूनच तो आता घडलेला आहे”.
आणखी वाचा –
दरम्यान, सूरज चव्हाण हा मूळचा बारामतीतील मोढवे या गावातला आहे. यावेळी त्याच्या गावकऱ्यांना प्रचंड आनंद झाला. त्याच्या हातात ट्रॉफी पाहून सगळेच खुश झाले. सुरूवातीपासूनच सूरजला त्याच्या गावकऱ्यांचा तूफान पांठिबा मिळत होता. त्यातून सूरजलाही विश्वास होता की तो बिग बॉस मराठीची ट्रॉफी नक्कीच जिंकेल. त्यामुळे मीच ट्रॉफी जिंकणार म्हणत त्याने आपला शब्द खरा करून दाखवला आहे. नुकतीच त्याने त्याच्या गावातील एका शाळेला भेट दिली होती.