Paaru Marathi Serial Update : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेत एका मागोमाग एक रंजक वळणे येताना पाहायला मिळतात. मालिकेत आता सध्या मोठे वळण आलेलं पाहायला मिळत आहे. मालिकेत दिशा व प्रीतमची लगीन घाई सुरु असलेली पाहायला मिळतेय. तर आज त्यांचं लग्न होताना पाहायला मिळत आहे. प्रीतमच्या मनाविरुद्ध हे लग्न होताना पाहायला मिळत असून आदित्य व पारू अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हे लग्न होऊ नये यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. तर इकडे आदित्यने पारुला आबासाहेबांना सर्व सत्य सांगायला म्हणून गावाकडे पाठवलेलं असतं.
पारू आबासाहेबांना सर्व काही सत्य सांगते. पारू सांगते की, सयाजीराव फाउंडेशन हे तुमच्याच नावाने अहिल्यादेवींनी चालू केलेलं फाउंडेशन आहे आणि या फाउंडेशन अंतर्गत अनेक गावे त्यांनी दत्तक घेतली आहेत. तसेच रस्ते, शाळा, कॉलेज यांची त्यांनी उभारणी केली आहे. पारू सांगते की, आज प्रीतम सरांचे लग्न आहे त्यामुळे मला ही जावंच लागेल. मात्र प्रिया मॅडमचं प्रीतम सरांवर प्रचंड प्रेम आहे आणि प्रीतम सरांसारखा मुलगा प्रिया मॅडमना शोधूनही सापडणार नाही. आणि अहिल्यादेवींना हे माहीत नाही की प्रिया मॅडम या तुमची आहेत. हे ऐकताच आबासाहेब प्रियाकडे पाहतच राहतात. त्यानंतर पारू तिथून निघून जाते.
तर इकडे दिशा व प्रीतम यांचं लग्न सुरु असतं. दिशाने सुद्धा स्वतःच्या तालावर प्रीतमला नाचवण्याची पूर्ण तयारी केलेली असते. तर दिशाने इकडे मिहीरचं एक्सीडेंट घडवून आणलेला असतो तर पारूच्याही मागे तिची माणसं पाठवलेली असतात. आदित्य मिहीर अजून आला कसा नाहीये हे तपासायला म्हणून त्याला फोन करतो तेव्हा आदित्यला कळतं की, त्याचं एक्सीडेंट झालं आहे. त्यानंतर तो पारूला फोन करतो. तेव्हा पारू सांगते की, आबासाहेबांना मी सर्व काही सांगितलं आहे पण आबासाहेब काहीच बोलले नाही आणि ते कोणत्याच गोष्टीसाठी तयार होत नाहीयेत. मी खूप प्रयत्न केले त्यामुळे तुम्ही स्वतः जाऊन अहिल्यादेवींना सगळं काही खरं खरं सांगा. त्यानंतर आदित्य अहिल्यादेवींशी बोलायचं आहे असं सांगून आईला रूममध्ये बोलवून घेतो.
आणखी वाचा – शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांना राहतं घर सोडावं लागणार, ईडीकडून नोटीस, १० दिवसांत बंगल्यामधून जावं लागणार
आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, दिशाची माणसं पारूला अडवतात आणि पारूला पकडून घेऊन जातात. तर इकडे अहिल्यादेवींना आदित्य सगळं काही खरं सांगतो की, प्रीतमचं प्रियावर प्रचंड प्रेम आहे. हे ऐकल्यावर अहिल्या देवी आदित्यकडे पाहतच राहतात. आता मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.