KajoL Viral Video with Son : सर्वत्र दुर्गापूजेचे आगमन झाले असून सर्वसामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटीही उत्साहाने या सणात सहभागी होत आहेत. एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर, हा सण उत्साहात साजरा होताना पाहायला मिळत आहे. अभिनेत्री काजोलही दरवर्षीप्रमाणे अतुलनीय उर्जेने हा उत्सव साजरा करताना दिसत आहे. अलीकडेच ती पंडालमधील सर्व तयारींवर देखरेख करताना दिसली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काजोल तिचा मुलगा युगला हाताला धरुन घेऊन येत आहे. माँ दुर्गेचा आशीर्वाद घेण्यासाठी ती त्याला घेऊन येताना दिसत आहे आणि उत्सवादरम्यान आई व मुलाचा हा खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये काजोल तिचा मुलगा युगबरोबर दुर्गापूजेच्या उत्सवादरम्यान दिसत होती. क्लिपमध्ये, युग स्टेजवरुन चालताना दिसत आहे पण काजोल हळूवारपणे त्याला परत बोलावते आणि त्याच्याशी बोलताना दिसत आहे. मग काजोल त्याला स्वतःबरोबर घेऊन जाते. काजोल पूर्ण वेळ तिच्या मुलाचा हात धरुन आहे. या क्लिपने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. काजोलने युगला अशाप्रकारे कॅप्चर केल्याची टीका काही लोक करत आहेत, तर काही जण तिची प्रशंसा करत आहेत.
आई व मुलाचा हा सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ शेअर होताच चाहत्यांना कमेंट करण्यापासून रोखता आले नाही. एका यूजरने म्हटले आहे की, काजोलने तिच्या मुलाचा हात खूप सुंदर पकडला आहे. या सुंदर माय लेकाच्या प्रेमात पडलो. तर एकजण म्हणाला, “तो खूप वेगाने मोठा होत आहे”. तर एक युजर म्हणाला, “ही जोडी प्रत्येक क्षणी अशीच राहो”. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी दोघांचे खूप कौतुक केले.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : दिशामुळे पारूच्या जीवाला धोका, आबासाहेब प्रियाला घेऊन अहिल्यासमोर येणार का?
यावेळी काजोलने सुंदर साडी नेसली होती. तर सुंदर दागिन्यांमध्ये आणि वेणीच्या हेअरस्टाईलमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. तिचा पारंपरिक लूक खूप खास होता. दरम्यान, तिचा मुलगा युग याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा घातलेला होता. चाहत्यांनीही तिच्या या लूकचे भरभरुन कौतुक केले. यापूर्वी काजोलने दुर्गा पूजा पंडालमध्ये जया बच्चनबरोबरचा एक खास क्षणही शेअर केला होता. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोघांनी एकमेकींना मिठी मारली. जयानेही काजोलला तिच्या गालावर प्रेमाने किस केले. त्यांच्यातील हे बॉन्ड पाहून लोक त्यांचेही कौतुक करत आहेत.