Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अनुष्का अहिल्यादेवींच्या परीक्षेत पास झालेली असते. अहिल्यादेवी अनुष्काच्या करारीपणाचे कौतुक करतात आणि तू मला आवडली आहेस, असं म्हणतात. यावर अनुष्काच्या ही डोळ्यात पाणी येतं. आईसारखा मान देऊन अनुष्काही अहिल्यादेवींचे आशीर्वाद घेते. त्यावर अहिल्यादेवी तू मला माझ्या प्रिया सारखीच आहेस असं म्हणतात. त्यानंतर सगळेच घरातली मंडळी बसलेली असतात. तेव्हा आदित्य अहिल्यादेवींवर चिडतो आणि म्हणतो की, ‘तू मला याबद्दल आधीच का नाही सांगितलंस’. यावर अहिल्यादेवी सांगतात की, ‘मी तुला सगळं सांगणारच होते पण माझी परीक्षा होती म्हणून मी काही म्हणाले नाही’. त्यानंतर श्रीकांतही आदित्य जवळ काल ती झोपली नव्हती ती नाटक करत होती, असं सांगतो.
त्यानंतर आदित्य व प्रीतम कामानिमित्त निघून जातात. तेव्हा प्रिया अहिल्यादेवींना म्हणते की, ‘तुम्हाला अनुष्काची परीक्षा का घ्यावीशी वाटली. तुम्हाला ती सून म्हणून नको आहे का?’, यावर अहिल्यादेवी म्हणतात की, ‘असं काहीच नाहीये. ही माझी चिट्टी’, अस म्हणत प्रियाच्या हातात चिठ्ठी देतात. चिठ्ठी प्रिया उघडून पाहते तर त्यात अनुष्काचं नाव लिहिलेलं असतं. म्हणजेच आदित्यसाठी अहिल्याला अनुष्काच आवडलेली असते. मात्र अहिल्यादेवी सांगतात की, ‘आता तू याबद्दल कोणालाच काही सांगू नकोस. आपण आता अनुष्काच्या घरी जाणार आहोत तेव्हाच मी अनुष्काला आदित्य साठी मागणी घालणार आहे’. हे ऐकल्यावर प्रिया खूपच खुश होते. आणि ती ही आनंदाची बातमी सांगायला पारूजवळ जाते. पारू व सावित्री आत्या किचनमध्ये काम करत असतात तेव्हा त्या गोडाधोडाचे बनवण्याबद्दल बोलत असतात. तेव्हा प्रिया सांगते की, ‘हो आज गोडाधोडाचं कर कारण आज खूप आनंदाची बातमी मिळाली आहे’.
आणखी वाचा – अखेर धनुष व ऐश्वर्या रजनीकांत विभक्त, लग्नाच्या १८ वर्षांनी घेतला घटस्फोट
यावर असं म्हणत सांगते की, ‘अहिल्यादेवी मॅडम अनुष्काच्या घरी जाऊन आदित्य सरांसाठी तिला मागणी घालणार आहेत’. हे ऐकल्यावर पारूच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा प्रियाला वाटतं की, पारू व आदित्यच्या मैत्रीमुळे पारूच्या डोळ्यात पाणी आलं आहे। पारूलाही खूप आनंद झाला आहे असं म्हणत प्रिया पारूचं सांत्वन करते आणि निघून जाते. त्यानंतर सावित्री पारूला समजावण्याचा प्रयत्न करते. तेव्हा पारू सांगते की, ‘जे नशिबात आहे तेच होणार. ते कोणीच थांबवू शकत नाही’. त्यानंतर सगळेचजण अनुष्काच्या घरी जायला निघतात. तेव्हा अहिल्यादेवी पारुलाही बरोबर घेऊन जातात. सगळेजण घरी जात असतात. घरी गेल्यावर अनुष्का तिच्या मामी बरोबर सगळ्यांची ओळख करुन देते. मीटिंगला सुरुवात करण्यापूर्वीच अनुष्का सगळ्यांसाठी चहा बनवायला जाते. तेव्हा दामिनी पारूचा अपमान करते आणि सांगते की, ‘तू इथे मीटिंगमध्ये काय करणार आहेस. तू या घरातली काही काम असतील तर ती कर’.
आणखी वाचा – मेहंदी है रचनेवाली! रेश्मा शिंदेच्या हातावर रंगली मेहंदी, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, फोटो व्हायरल
यावर अहिल्यादेवी दामिनीला थांबवतात की, ‘हे आपलं घर नाहीये’. तरीसुद्धा दामिनी तिला बोलते त्यानंतर पारू निघून जाते आणि अनुष्काची मामी करत असणारे काम ती स्वतः करायला सुरुवात करते. तेव्हा अनुष्काची मामी पारूला थांबवत म्हणते की, ‘तू या कंपनीची ब्रँड अँबेसेडर आहेस ना. मग तू हे घरकाम का करतेस’. तेव्हा दामिनी पाठीमागून येत सांगते की, ‘ती आमच्या घराची नोकर सुद्धा आहे. तिला तुम्ही कोणतेही काम द्या ती सगळी काम करेल’. आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, अहिल्यादेवी आदित्यच्या वाढदिवसाचं औचित्य साधत अनुष्काला मागणी घालतात. आता अनुष्का आदित्यची मागणी स्वीकारणार का हे सर्व पाहणं रंजक ठरेल.