Tharla Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, सायलीला अर्जुनने दिलेली चिठ्ठी तिने फाडून टाकलेली असते. त्यामुळे त्याचा मोठा गैरसमज झालेला असतो. तो सतत चिडचिड करत असतो. हे पाहून चैतन्य याचा शोध लावायचा म्हणून किचनमध्ये येतो आणि सायलीने फाडून टाकलेल्या चिठ्ठीचा शोध घेतो. त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की, सायलीने फाडलेली चिठ्ठी ही अर्जुनने लिहिलेलं पत्र नाहीये. सगळे कागद घेऊन तो वर येतो तेव्हा अर्जुनला असं वाटतं की, चैतन्य मुद्दाम हे करत आहे. त्यामुळे तो चैतन्यवर भडकतो. मात्र, चैतन्य अर्जुनला सांगतो की, ‘तू थांब मी तुला काहीतरी दाखवतो’ असं म्हणतो. तो चिठ्ठी एकत्र करतो तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की, सायलीने फाडलेली ही चिठ्ठी वाण सामानाची यादी आहे. मग अर्जुनच्या लक्षात येतं की, मी तर ती चिठ्ठी तिच्या डोळ्यासमोरच ठेवली होती. मग ती चिठ्ठी कुठे गेली.
त्यानंतर चैतन्य व अर्जुन दोघेही किचनमध्ये येतात आणि ती चिठ्ठी शोधू लागतात. तेव्हा सगळ्यांच्याच लक्षात येतं की, हे काहीतरी शोधाशोध करत आहेत. तेव्हा चैतन्य थाप मारतो की, आम्ही एक महत्त्वाचा फोन नंबर लिहिलेला कागद शोधत आहे. सायलीलाही इकडे काळजी वाटत असते की, अर्जुनने मी बनवलेली बिस्किट त्या बिस्किटांचा आकार, रंग काहीच पाहिलं नाहीये त्यामुळे माझ्या मनातील भावना आता त्यांना कशा सांगायच्या. जर इथे आई असत्या म्हणजेच (कल्पना) तर त्यांनी नक्कीच मला काहीतरी आयडिया दिली असती. इतकंच नाही तर सायली ठरवते की, आता मी याबद्दल मधु भाऊंनाच विचारते. तर इकडे प्रतिमा आणि प्रिया सुभेदारांच्या घरुन किल्लेदारांच्या घरी जातात. रविराज प्रतिमाला पाहून खूप खुश होतो. तर प्रिया सुद्धा रविराज बरोबर गोड गोड बोलण्याचा प्रयत्न करते आणि ती तिच्या रुममध्ये जाते. तेव्हा प्रतिमाला रविराज म्हणतो की, ही सुभेदारांच्या घरी गेली होती म्हणजे नक्कीच तिथे काहीतरी घोळ घातला असावा.
मात्र प्रतिमा सांगते की, तसं काही झालेलं नाहीये. तेव्हा रविराजच्या जीवात जीव येतो. त्यानंतर कामानिमित्त रविराज घराबाहेर पडतो. तेव्हा प्रतिमा घराबाहेरच फेऱ्या मारत असते. त्यावेळेला तिथं एका बाजूला आग केलेली असते. ती आग पाहून प्रतिमा घाबरते कारण महिपतने तिला आगीत जाळण्याचा प्रयत्न केला होता, ही भीती तिच्या मनात सतावत असते. तेव्हापासून तिला आगीचा फोबिया झालेला असतो. आग पाहून प्रतिमा प्रचंड घाबरते आणि त्याच वेळेला कामानिमित्त तिथून महिपत जात असतो त्याला पाहून प्रतिमा खूप घाबरते आणि बेशुद्ध पडते.
आणखी वाचा – अखेर धनुष व ऐश्वर्या रजनीकांत विभक्त, लग्नाच्या १८ वर्षांनी घेतला घटस्फोट
जवळपासची माणसं प्रतिमाला सावरण्याचा प्रयत्न करतात. त्याच वेळेला रविराजही तिथे येतो तेव्हा प्रतिमा महिपतकडे बोट दाखवत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. मात्र रविराजला ती नेमकं काय सांगत आहे हे समजत नाही. आता महिपतच सत्य सगळ्यांसमोर उघड होणार का हे सारं पाहणं मालिकेचे येणाऱ्या भागात रंजक ठरेल.