Dhanush And Aishwarya Rajinikanth Divorce : दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचा अधिकृत घटस्फोट झाला आहे. २७ नोव्हेंबर २०२४ रोजी चेन्नई फॅमिली कोर्टाने हा घटस्फोट मंजूर केला असल्याचं समोर आलं आहे. १८ वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. तामिळनाडूतील कौटुंबिक न्यायालयाने बुधवारी धनुष व ऐश्वर्या रजनीकांत यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली. चित्रपट दिग्दर्शक कस्तुरीराजाचा मुलगा धनुष आणि सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या यांचा विवाह १८ नोव्हेंबर २००४ रोजी दोन्ही कुटुंबांच्या आशीर्वादाने झाला. त्यांना यात्रा व लिंग असे दोन पुत्र आहेत.
अनेक वर्षांच्या लग्नानंतर धनुष व ऐश्वर्या रजनीकांत यांनी २०२२ मध्ये वेगळे होण्याची घोषणा केली होती आणि जानेवारी २०२२ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. हे दोघेही तीनवेळा कोर्टाच्या सुनावणीला हजर झाले नसले तरी २१ नोव्हेंबरला चेन्नई कोर्टात दोघांनीही इन-कॅमेरा कारवाईत भाग घेतला. २१ नोव्हेंबर रोजी ते न्यायमूर्ती सुभादेवी यांच्यासमोर हजर झाले, ज्यांनी इन-कॅमेरा सुनावणी घेतली.
आणखी वाचा – मेहंदी है रचनेवाली! रेश्मा शिंदेच्या हातावर रंगली मेहंदी, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, फोटो व्हायरल
यादरम्यान दोघेही विभक्त होण्यावर ठाम राहिले आणि अखेर बुधवारी न्यायाधीशांनी दोघांच्या घटस्फोटाला मंजुरी दिल्याचे सांगण्यात समोर आले. १७ जानेवारी २०२२ रोजी धनुष व ऐश्वर्याने एक संयुक्त निवेदन जारी करुन वेगळे होण्याची घोषणा केली होती. त्यांनी लिहिले होते, “१८ वर्षांच्या मैत्रीनंतर, पती, पत्नी आणि आई-वडील म्हणून एकत्र घालवलेल्या वेळेनंतर आम्ही दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे”.