मनोरंजन विश्वात काम करत असताना अनेकांना दिलेली कमिटमेंट ही पाळावीच लागते. किंबहुना अनेक कलाकार मंडळी त्यांची ही कमिटमेंट स्वत:हूनच पाळतात. मग त्या कमिटमेंटपुढे कोणतंही संकट येवो. मनोरंजन सृष्टीतील अनेकजण या कमिटमेंटसाठीच ओळखले जातात. यापैकीच एक कलाकार म्हणजे अर्चना सिंह. अर्चना पूरण सिंह या कपिलच्या शोचा एक महत्त्वाचा भाग आहे. अर्चना त्याच्या पहिल्या शो ‘कॉमेडी नाईट विथ कपिल’पासून ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’पर्यंत कपिलबरोबर आहेत. हा शो स्वतःच मजेशीर आहे, पण अर्चना सिंग त्यांच्या हसण्याने या शोचे आकर्षण आणखी वाढवते. मात्र त्यांचं काम वाटतं तितकं सोपं नाही. (Archana Puran Singh News)
अर्चना पूरण सिंह सध्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या दुसऱ्या सीझनचे शूटिंग करत आहे. अशातच त्यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत एका प्रसंगाबाबत सांगितले, ज्यावरुन ‘शो मस्ट गो ऑन’चा प्रत्यय येतो. याबाबत बोलताना अर्चना यांनी एक प्रसंग शेअर केला आणि त्यांनी सांगितले की, त्यांच्या सासूच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतरही त्यांनी ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या या शोचे हसत हसत चित्रीकरण केलं. त्यांच्या मनात सासूची निधनाचे दु:खी वृत्त असूनही त्यांनी कॅमेऱ्यासमोर हसण्याचा अभिनय केला. मात्र, तरीही यासाठी त्याने शोच्या निर्मात्यांना जबाबदार धरलेले नाही.
याबद्दल त्यांनी ‘ईन्स्टंट बॉलिवूड’शी संवाद साधला. यावेळी अर्चना सिंह असं म्हणाल्या की, “मी माझ्या सासूच्या खूप जवळ होते, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मी शोचे शूटिंग करत असताना मला अचानक फोनवर कळले की माझ्या सासूचे निधन झाले आहे. त्यानंतर मी प्रॉडक्शन हाऊसला फोन केला आणि त्यांना सांगितले की मला निघून जावे लागेल. तेव्हा निर्मात्यांनी मला माझ्या हसण्याचे काही शॉट्स देण्याची विनंती केली, जे नंतर शो दरम्यान वापरता येतील”.
आणखी वाचा – ‘राजा राणीची गं जोडी’ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
अर्चना यांनी पुढे सांगितले की शूटिंग दरम्यान मी हसत होते आणि माझे मन पूर्णपणे रिकामे होते. तेव्हा फक्त माझ्या मनात सासूच्या मृत्यूचा विचार चालू होता. हे काय चाललंय असा प्रश्न मला पडत होता. त्यावेळी मी कशी हसली ते मला कळले नाही. पण तुम्ही ३०-४० वर्षे इंडस्ट्रीत काम करत असताना तुम्हाला माहीत आहे की तुम्ही करत असलेल्या कामात निर्मात्यांनी खूप पैसा गुंतवला आहे, त्यामुळे तुम्ही तुमचं काम अपूर्ण सोडू शकत नाही”.