Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, एकीकडे आदित्यला एक स्थळ घेऊन मॅरेज ब्युरोमधून एक महिला आलेली असते. दामिनी तिला विचारते की, ‘काय बोलायचं आहे ते माझ्याशी बोल’. मात्र मॅरेज ब्युरोमधून आलेली महिला सांगते की, ‘नाही मला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे आणि ते सुद्धा अहिल्यादेवींना सांगायचं आहे’. तरीसुद्धा दामिनी तिच्याशी हुज्जत घालू लागते. तितक्यातच अहिल्यादेवी खाली येतात तेव्हा दामिनी शांत होते. अहिल्यादेवींच्या हातात एक फोटो ठेवते आणि ती महिला सांगते की, ‘मी या मुलीचं स्थळ घेऊन आले आहे’. तर यावर अहिल्यादेवी सांगतात की, ‘मी या मुलीला ओळखते ही तर अनुष्का आहे’.
यावर मॅरेज ब्युरोमधून आलेली महिला सांगते की, ‘हो पण त्या दिवशी माझ्याकडे हिच्याबद्दल माहिती नव्हती पण आता माझ्याकडे हिच्या बद्दल माहिती आहे. तुम्ही फक्त हो म्हटलं तर मी तिच्या घरच्यांशी बोलते. आई वडिलांशिवाय वाढलेली पोर आहे. तिच्या मामा-मामीने तिला वाढवलं आहे आणि स्वतःच्या पायावर उभी आहे. परदेशात शिकून मोठी झाली आहे”, असं बरंच काही ती सांगत असते. तेव्हा अहिल्यादेवी सांगतात की, ‘आम्हाला काहीच घाई नाही आहे. आदित्य ज्या मुलीला पसंत करेल त्या मुलीशीच मी त्याचं लग्न लावून देणार आहे’. त्यांनतर किर्लोस्कर मेंशनमध्ये सावित्रीच्या गाण्याचा कार्यक्रम ठेवलेला असतो. सगळेजण जमलेले असतात. सावित्री गाणं गाऊन झाल्यानंतर अहिल्यादेवी तिचं भरभरुन कौतुक करतात. त्याच वेळेला पारूने माळलेल्या गजऱ्याकडे अहिल्यादेवींचे लक्ष जातं आणि त्या पारूला म्हणतात, ‘हा गजरा तुला कोणी दिला आहे, किती सुगंध पसरला आहे आणि तुम्ही खूप सुंदर दिसत आहात’. त्याच वेळेला अहिल्यादेवी आदित्यच्या लग्नाचा विषय काढतात.
आणखी वाचा – “तिची सासू म्हणून मी मिरवणार आणि…”, सासूबाईंकडून मृणाल दुसानिसचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “खूप हुशार आणि…”
प्रिया सांगते की, ‘आदित्य सरांसाठी कोणती मुलगी हवी यासाठी आपण वोटिंग करुया आणि त्यानुसार सगळेजण एक एक चिठ्ठी घेऊन वोट करु लागतात’. पारुलाही ते वोट करायला सांगतात. अर्थातच दामिनी तिच्या भाचीच म्हणजे मिथिलाचं नाव लिहिते. तर प्रिया आणि श्रीकांत या अनुष्काचं नाव लिहितात. तर प्रीतम त्या चिठ्ठीमध्ये दादाला जी मुलगी आवडेल त्या मुलीशी त्याने लग्न करावं असं लिहितो. तर अहिल्यादेवी आणि पारू चिठ्ठीत काहीच लिहीत नाहीत. पारू याबद्दल विचारताच सांगते की, असं काहीच नाही आणि शांत बसते. तर अहिल्यादेवी सांगतात की, ‘मी सुद्धा चिठ्ठीत काहीच लिहिलं नाहीये याचा अर्थ असा नाही की मला यापैकी कोणतीच मुलगी आवडली नाहीये पण मला असं वाटते की आपण कोणतीच घाई करायला नको आदित्यला जी मुलगी आवडेल त्या मुलीशी मी त्याचं लग्न लावून देईल’.
तर आदित्यने चिठ्ठीत लिहिलेलं असतं की, आईला जी मुलगी आवडेल त्या मुलीशी मी लग्न करेल. अशा प्रकारे हा आदित्यला मुलगी पसंत करण्याचा खेळ संपतो. त्यानंतर सगळेच जण आपापल्या रूम मध्ये जातात. तर अहिल्यादेवी श्रीकांत जवळ काळजी व्यक्त करतात की, आपण आदित्यच्या लग्नाची घाई तर करत नाहीये ना?, माणसं ओळखायला मी एकदा चुकले तेव्हापासून माझ्या मनात भीतीच बसली आहे. तेव्हा अहिल्यादेवींची श्रीकांत समजूत काढतो.