Mrunal Dusanis Family : कलाविश्वातील अशी बरीच कलाकार मंडळी आहेत जी अभिनयाबरोबर व्यवसाय क्षेत्रातही कार्यरत आहेत. अनेक कलाकार मंडळींनी अभिनयबरोबर व्यवसाय क्षेत्रात जम बसवायला सुरुवात केली आहे. अशातच नुकत्याच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्या नवऱ्याबरोबर मिळून हॉटेल क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. अभिनेत्री मृणाल दुसानिसने तिचा नवरा नीरज मोरेसह मिळून ठाण्यात स्वत:चं रेस्टॉरंट सुरु केलं आहे. . मृणाल-नीरजने रविवारी सर्वांना आनंदाची बातमी दिली. मृणाल आणि नीरज या दोघांनी ठाण्यात स्वतःचं रेस्टॉरंट सुरु केलं असून याचं नाव Belly Laughs असं आहे. ठाण्यातील हिरानंदानी भागात मृणालने हे रेस्टॉरंट उघडलं आहे. पहिल्याच दिवशी लाईव्ह संगीत आणि मराठी कलाकारांच्या उपस्थितीत या रेस्टॉरंटचं उद्घाटन करण्यात आलं.
यावेळी कलाविश्वातील बरीच कलाकार मंडळी उपस्थित होती. ज्ञानदा रामतीर्थकर, राजश्री निकम, वंदना गुप्ते, शर्मिष्ठा राऊत यांसह अनेकांनी रेस्टॉरंटच्या उद्घाटनाला हजेरी लावली. यावेळी मृणालचे कुटुंबीयही उपस्थित होते. इतकंच नव्हे तर या उदघाटन सोहळ्याला मृणालच्या सासूबाईही उपस्थित होत्या. त्यांच्याशी ‘मज्जा पिंक’ या युट्युब चॅनेलने संवाद साधला. यावेळी त्यांनी सूनेबाबत आणि सूनेच्या कर्तृत्त्वाबाबत भरभरुन भाष्य केलं.
आणखी वाचा – दाक्षिणात्य चित्रपटातील खलनायक मेघनाथन यांचे निधन, आजाराशी झुंज अपयशी, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर
यावेळी बोलताना मृणालच्या सासूबाई म्हणाल्या की, “मृणाल, नीरज आणि नुरवी भारतात परतले आहेत हे आई म्हणून माझ्यासाठी खूप सुखावणारं आहे. सगळ्यात जास्त आनंद आता झाला आहे. हे तिघेही भारतात परतणार हे जेव्हा त्यांनी मला सांगितलं तेव्हा नीरजच्या जन्मावेळी मला जेवढा आनंद झाला होता तेवढा आनंद आता झाला. दोघांनी मिळून सुरु केलेल्या हॉटेलमध्ये माझ्या टिप्स मी तशा काही दिल्या नाही आहेत, कारण नीरज व मृणाल दोघेही खूप हुशार आहेत. दोघांनी विचार करुन सर्व काही केलं आहे. मृणालची नवी मालिका येत आहे, मालिकेचा प्रोमो समोर आला तो पाहून खूप आनंद झाला, प्रोमो खूप छान आहे”.
आणखी वाचा – ट्रेनमध्ये आरामात झोपून मलायका अरोराचा प्रवास, चेहरा पाहून ओळखणंही कठीण, फोटो व्हायरल
पुढे त्या असंही म्हणाल्या की, “सासू म्हणून मृणालला माझा पूर्ण पाठिंबा आहे. तिची मालिका आणि हॉटेल सुरु झाल्याने अर्थात ती व्यस्त होईल त्यामुळे मी छोटीला सांभाळायला इथेच राहणार आहे. नुरवीबरोबर वेळ कसा जातो हे मलाही कळत नाही. आमची नुरवी खूप गोड आहे. सून म्हणून मृणाल अगदी माझ्या मुलीसारखीच आहे. खूप गोड आणि लाघवी आहे. मृणाल आल्यानंतर तसे काही खूप नीरजमध्ये बदल झाले नाहीत, कारण नीरज आधीपासूनच शांत स्वभावाचा आहे. आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा आहे. आता मालिकेत पुन्हा मृणाल दिसणार त्यामुळे तिची सासू म्हणून मी आता सुद्धा मिरवत आहे”.