झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत काही दिवसांपूर्वी चारुलताची एन्ट्री झाली आणि या एन्ट्रीमुळे मालिकेला एक वेगळंच वळण आलं. अक्षराने स्वत:हून तिला घरी आणलं होतं. काही दिवसांपूर्वी चारुहासने भुवनेश्वरीला घरातून बाहेर काढल्यानंतर अक्षराला चारुलता सापडते. त्यांच्यात सर्व काही आलबेल सुरु असतानाच मालिकेत नवीन ट्विस्ट येतो तो म्हणजे अक्षराला चारुलता व भुवनेश्वरी यांच्यातील सत्य समजते. काही दिवसांपूर्वी बाजारात अक्षराला चारुलता भुवनेश्वरी असल्याचा भास होतो आणि त्यानंतर ती हे घरातील सर्वांना सांगते. पण तिने हे सगळ्यांना सांगितल्यानंतर घरातील सर्व तिला वेडी ठरवतात. यामुळे भुवनेश्वरी तिला प्लॅन करुन हॉस्पिटलमध्ये दाखल करते. (Tula Shikvin Changlach Dhada Serial Updates)
चारुहास व अक्षराने जरी चारुलताला स्वीकारलं असलं तरीही अधिपती काही केल्या तिला आई म्हणून स्वीकारण्यास तयार नसल्याचे पाहायला मिळत होते. पण नुकत्याच झालेल्या भागात अधिपतीने चारुलताला आईसाहेब म्हणून साद दिल्याचे पाहायला मिळाले. गेले काही दिवस अधिपतीने चारुलताला आपली आई म्हणून स्वीकारावे यासाठी अक्षरा प्रयत्न करताना दिसत होती. पण अधिपती काही केल्या चारुलताला आपली आई म्हणून स्वीकारण्यास तयार नव्हता. अशातच त्याने चारुलताला आईसाहेब म्हणून साद दिली. पण आता भुवनेश्वरीच्या जाळ्यात अधिपती अडकला जाणार असल्याची भीती तिला वाटत आहे आणि याचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे.
आणखी वाचा – अमोल गंभीर आजाराशी कसा करणार सामना?, अर्जुनने खूश करण्यासाठी दिलं खास गिफ्ट, त्यात अप्पीचाही फोटो अन्…
या नवीन प्रोमोमध्ये अक्षरा “मला इथे डांबून ठेवलं आहे. आता भुवनेश्वरी तिकडे अधिपती आणि चारुहासला काय सांगत असेल काय माहित?” असं स्वत:शीच बोलताना दिसत आहे. त्यानंतर चारुलता घरातील सर्वांना “अक्षराची इच्छा होती म्हणून मी या लग्नाला तयार झाली. पण आता भुवनेश्वरीच घरी नाही तर मी हे लग्न नाही करत” असं म्हणते. तसंच भुवनेश्वरीच चारुलता असल्याचे सर्वांना कसं सांगणार? हा प्रश्न अक्षरालाला पडला आहे. तसंच अक्षरा वेडी ठरवण्यात आलेले असून यातून ती कशी बाहेर पडणार? हा प्रश्नही तिला सतावत आहे.
आणखी वाचा – Video : अलका कुबल, सई ताम्हणकरसह इतर मराठी कलाकारांच्या गौतमी पाटीलबरोबर रंगल्या गप्पा, चाहत्यांकडून कौतुक
दरम्यान, मलिकेत इतके दिवस अधिपती व चारुलता यांच्यात थोडे तणावपूर्वक नाते होते. अधिपती चारुलताला आपली आई म्हणून स्वीकारण्यास तयार नव्हता. पण आता त्याने चारुलताला आपली आई म्हणून स्वीकारले की काय? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. तसंच चारुलताच्या या जाळ्यात अडकलेल्या अधिपती व चारुहासला अक्षरा कशी बाहेर काढणार? हे आगामी भागातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.