Tharla Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, सायली व अर्जुन झोपलेले असतात. त्या वेळेला सायलीच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरुन मॅसेज येतो. तो मॅसेज अर्जुन वाचतो. त्या मॅसेजमध्ये असे लिहिलेले असते की, ‘तुझ्याशी बोलून फार बरं वाटलं। मन मोकळं झालं. आपण लवकरच भेटू’, हा मॅसेज वाचून अर्जुनला समजत नाही की सायलीला हा मॅसेज करणारी व्यक्ती नेमकी कोण आहे. अर्जुन रात्रभर याच विचारात असतो. शिवाय अर्जुनला सायलीच्या मोबाईलवरुनही मॅसेज आलेला असतो, त्यामुळे आधीच तो त्या चिंतेत असतो. त्यानंतर सायली सकाळी उठून पाहते तर तिला सुद्धा हा नंबर अनोळखी वाटतो.
सायली या नंबरबाबत अर्जुनला सांगून चौकशी करायला लावणार असते. इतक्यातच त्याच नंबर वरुन सायलीला फोन येतो. सायली फोनवर बोलू लागते तेव्हा समोरुन प्रतिमाचा आवाज ती ओळखते आणि म्हणते की, ‘प्रतिमा आत्या तुम्ही आहात’. हे ऐकल्यावर प्रतिमाला कळतं की, सायलीने आपला आवाज लगेच ओळखला आहे. त्यानंतर त्या दोघीही गप्पा मारू लागतात. सायली कोणाशी तरी आनंदाने गप्पा मारतेय हे पाहून अर्जुनचा जीव कासावीस होतो. सायलीला तो विचारतो की, कोणाशी बोलतेय. मात्र सायली उत्तर देण्यास टाळाटाळ करते आणि रूम मधून निघून जाते.
त्यानंतर इकडे सायलीच्या मनात येतं की, मधु भाऊ परत जाण्याच्या आधी आपण अर्जुनला आपल्या मनातलं सगळं काही सांगून टाकावे. यासाठी ती एखाद्या चांगल्या ठिकाणाची निवड करण्याचं ठरवते. आणि अस्मिताला जवळ एखाद्या चांगल्या रेस्टॉरंट बद्दल विचारपूस करते. अस्मिताही तिला रेस्टॉरंट बद्दल सांगते. तेव्हा सायलीच्या मनात येते की, आपण आधी स्वतः जाऊन त्या रेस्टॉरंट बद्दल जाणून घ्यावं आणि मगच आपल्याला आवडलं तरच आपण तिथे जावं म्हणून ती घराबाहेर पडण्यास निघते. त्यावेळेला अर्जुन सांगतो की, मी तुम्हाला सोडायला येतो मात्र सायली त्याला नकार देते आणि सांगते की, मी माझी माझी जाईन आणि बाहेर कामानिमित्त जात असल्याचे सांगून निघून जाते. त्यामुळे अर्जुनच्या मनातील हा संशय अजूनच बळकावतो. सायली चोरून कोणाला भेटत तर नाही ना असा संशय अर्जुनला वाटू लागतो. सायलीच्या मनात आणखीनच कोणीतरी नसेल ना असे अनेक प्रश्न अर्जुनला पडू लागतात. तर इकडे प्रिया सुभेदारांच्या घरी नेमकं काय सुरु आहे हे पाहायला अस्मिताला फोन करते. तेव्हा अस्मिता त्या रेस्टॉरंटबद्दल सायली चौकशी करत असल्याचं सांगते.
आणखी वाचा – “तिची सासू म्हणून मी मिरवणार आणि…”, सासूबाईंकडून मृणाल दुसानिसचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “खूप हुशार आणि…”
तेव्हा प्रियाच्या लक्षात येतं की, नक्कीच हे दोघं एकमेकांना प्रेमाची कबुली देणार आहेत. त्यावेळेला प्रिया दोघांना एकमेकांपासून कसे लांब ठेवायचं यासाठी युक्त्या शोधताना दिसते. तर अर्जुन खाली येतो तेव्हा अश्विन आणि चैतन्य बोलत असतात तेव्हा ते कॉलेजमधील दिवसांमधील प्रॅक मॅसेज बद्दल बोलत असतात. तेव्हा अर्जुनला चैतन्य वर संशय येतो की, सायलीच्या मोबाईलवरून चैतन्यने मॅसेज केला नसावा. आता या सगळ्या गैरसमजाच नेमकं काय होणार हे सारं पाहणं मालिकेत रंजक ठरेल.