शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

I Love You म्हणत आदित्यने पारूला केलं प्रपोज, मात्र हे सत्य की असत्य? नवीन प्रोमोमुळे उत्सुकता शिगेला

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 28, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Paaru Marathi serial update Aditya proposing to Paaru new promo viral on social media

पारू मालिकेत मोठा ट्विस्ट, I Love You म्हणत आदित्यने पारूला केलं प्रपोज, प्रोमो व्हायरल

‘पारू’ ही प्रेक्षकांची लाडकी मालिका आहे. या मालिकेत सतत काहीतरी घडताना दिसते. आदित्य-पारूची मैत्री तर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्याचे दिसते आहे. प्रत्येक वेळी आदित्यवर आलेल्या संकटातून पारू त्याला बाहेर काढताना दिसते आणि आदित्यदेखील पारूला वेळोवेळी मदत करताना दिसतो. अशातच आता दोघांच्या नात्याला नवं वळण येणार की काय असा प्रश्न मालिकेच्या प्रेक्षकांना पडला आहे. मालिकेत एकामागून एक नवीन वळण येतच असतात. अशातच आणखी एक नवं वळण आलं आहे ते म्हणजे आदित्यने पारूला थेट प्रेमाची मागणी घातली आहे. (Paaru Marathi serial update)

मालिकेच्या या नवीन ट्विस्टचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे आणि या नवीन प्रोमोमध्ये आदित्य पारूला थेट प्रेमाची मागणी घालताना दिसत आहे. या प्रोमोमदये आदित्य पारूला गुलाबाचे फूल देत असं म्हणतो की, “एका फुलाला फुलाची भेट. मी तुझ्यावर खरंच खूप मनापासून प्रेम करतो. माझं तुझ्यावर प्रेम आहे”. यानंतर आदित्य जोराने ओरडतो आणि पारूलं I Love You असं म्हणतो.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – Video : ‘सुख म्हणजे…’ फेम अभिनेत्याने मुंबईत घेतलं हक्काचं घर, बायकोच्या साथीने स्वप्न पूर्ण, म्हणाला, “उधळपट्टी करणारा मी…”

आदित्यने प्रेमाची मागणी घालताच पारूलाही अश्रु अनावर होतात. मालिकेच्या या नवीन ट्विस्टबरोबर “हे सत्य की असत्य?” असं कॅप्शन देण्यात आले आहे. मालिकेच्या या नवीन प्रोमोला प्रेक्षकांनीजी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. मात्र काहींनी हे सगळं असत्य असल्याचे सांगितलं आहे. “हे शुटींग सुरु आहे”, “हे नक्कीच स्वप्न असणार”, “हे सगळं असत्य आहे” अशा प्रतिक्रियांद्वारे नेटकऱ्यांनी या प्रोमोला प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – उर्मिला कोठारेच्या गाडीची दोन मजुरांना धडक, एकाचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय झालं?

दरम्यान, पारू मालिकेत अहिल्यादेवी अनुष्का व आदित्यचे लग्न लावणार आहेत. त्यामुळे आता एकीकडे पारू-आदित्य यांच्यातीळ जवळीक वाढत आहे. तर दुसरीकडे अहिल्यादेवी आदित्यचे अनुष्काबरोबर लग्न लावणार आहे. त्यामुळे आता मालिकेत पारू-आदित्य यांच्या नात्यात काय बदल होणार? आदित्यचे अनुष्काबरोबरचे लग्न यशस्वी होणार का? की या सगळ्याला आणखी काही नवं वळण येणार? यांची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.  

Tags: Aditya proposing to Parupaaru marathi serialpaaru marathi serial update
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
sikandar teaser out

सलमान खानच्या 'सिकंदर'चा टीजर प्रदर्शित, भाईजानचा लूक पाहून प्रेक्षकही भारावले, तुम्ही पाहिलात का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.