मराठी मनोरंजन सृष्टीतून एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. उर्मिलाच्या कारने दोघांना धडक दिली असून या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी आहे. शुटींग संपवून घरी परतत असताना उर्मिलाच्या कारचा हा अपघात झाला. एबीपी माझाच्या वृत्तानुसार, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव असलेल्या उर्मिलाच्या कारने दोन मजुरांना धडक दिली आणि ही धडक इतकी जोरात होती की यात कारचा मात्र चक्काचुर झाला. मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली. (urmila kothare car accident)
मेट्रोमध्ये काम करणाऱ्या दोन मजुरांना उर्मिलाच्या कारने जोरदार धडक दिली. या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला, तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला. अभिनेत्री उर्मिलाच्या कारचा वेग जास्त असल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगाने जात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या दोन मेट्रो कर्मचाऱ्यांना धडक दिली. ज्यात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि एक गंभीर जखमी झाला आहे.
आणखी वाचा – ‘दहावी-अ’च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, एका दिवसांतच एक लाखांपेक्षा अधिक व्ह्युज, उत्सुकता शिगेला
या अपघाता प्रकरणी मुंबईतील समतानगर पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्मिलाच्या कारचा वेग जास्त होता. त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगाने जात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या दोन मेट्रो कर्मचाऱ्यांना धडक दिली.
दरम्यान, मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे ही प्रसिद्ध दिग्दर्शक महेश कोठारे यांची सून आहे तर महेश कोठारेंचा मुलगा आदिनाथ कोठारेची पत्नी आहे. उर्मिला कोठारे ही नुकतीच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत झळकली होती. या मालिकेतून तब्बल १२ वर्षांनी उर्मिलाने छोट्या पडद्यावर कमबॅक केले होते. याशिवाय तिने दुनियादारी’, ‘शुभमंगल सावधान’, ‘ती सध्या काय करते’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.