‘पारू’ ही प्रेक्षकांची लाडकी मालिका आहे. या मालिकेत सतत काहीतरी घडताना दिसते. आदित्य-पारूची मैत्री तर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्याचे दिसते आहे. प्रत्येक वेळी आदित्यवर आलेल्या संकटातून पारू त्याला बाहेर काढताना दिसते आणि आदित्यदेखील पारूला वेळोवेळी मदत करताना दिसतो. अशातच आता दोघांच्या नात्याला नवं वळण येणार की काय असा प्रश्न मालिकेच्या प्रेक्षकांना पडला आहे. मालिकेत एकामागून एक नवीन वळण येतच असतात. अशातच आणखी एक नवं वळण आलं आहे ते म्हणजे आदित्यने पारूला थेट प्रेमाची मागणी घातली आहे. (Paaru Marathi serial update)
मालिकेच्या या नवीन ट्विस्टचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे आणि या नवीन प्रोमोमध्ये आदित्य पारूला थेट प्रेमाची मागणी घालताना दिसत आहे. या प्रोमोमदये आदित्य पारूला गुलाबाचे फूल देत असं म्हणतो की, “एका फुलाला फुलाची भेट. मी तुझ्यावर खरंच खूप मनापासून प्रेम करतो. माझं तुझ्यावर प्रेम आहे”. यानंतर आदित्य जोराने ओरडतो आणि पारूलं I Love You असं म्हणतो.
आदित्यने प्रेमाची मागणी घालताच पारूलाही अश्रु अनावर होतात. मालिकेच्या या नवीन ट्विस्टबरोबर “हे सत्य की असत्य?” असं कॅप्शन देण्यात आले आहे. मालिकेच्या या नवीन प्रोमोला प्रेक्षकांनीजी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. मात्र काहींनी हे सगळं असत्य असल्याचे सांगितलं आहे. “हे शुटींग सुरु आहे”, “हे नक्कीच स्वप्न असणार”, “हे सगळं असत्य आहे” अशा प्रतिक्रियांद्वारे नेटकऱ्यांनी या प्रोमोला प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा – उर्मिला कोठारेच्या गाडीची दोन मजुरांना धडक, एकाचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय झालं?
दरम्यान, पारू मालिकेत अहिल्यादेवी अनुष्का व आदित्यचे लग्न लावणार आहेत. त्यामुळे आता एकीकडे पारू-आदित्य यांच्यातीळ जवळीक वाढत आहे. तर दुसरीकडे अहिल्यादेवी आदित्यचे अनुष्काबरोबर लग्न लावणार आहे. त्यामुळे आता मालिकेत पारू-आदित्य यांच्या नात्यात काय बदल होणार? आदित्यचे अनुष्काबरोबरचे लग्न यशस्वी होणार का? की या सगळ्याला आणखी काही नवं वळण येणार? यांची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.