बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या खूप चर्चेत असलेला बघायला मिळत आहे. सलमान गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. संपूर्ण देशभरातच नाही तर जगभरात त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. दरवर्षी त्याचे धमाकेदार चित्रपट भेटीस येतात. त्याचा ‘टायगर ३’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. यामध्ये त्याच्याबरोबर कतरिना कैफ, इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत असलेले दिसून आले होते. तसेच हे वर्ष सुरु झाल्यानंतर ईदच्या दिवशी सलमानने त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट म्हणजे ‘सिकंदर’. काही महिन्यांपूर्वीच सलमानचा बहुचर्चित चित्रपट ‘सिकंदर’ चित्रपटाचे पोस्टर समोर आले होते. (sikandar teaser out)
सलमानच्या चित्रपटाचे पोस्टर समोर आल्यानंतर आता सलमानच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी चित्रपटाचा टीजर समोर आला आहे. समोर आलेल्या टीजरमध्ये सलमान पाठमोरा दिसत आहे. तसेच खूप हत्यारं ठेवलेल्या हॉलमधून जात आहे. आजूबाजूला मुखवटा लावलेले लोक आहेत. सलमान जसा पुढे येतो तसे मुखवटा घातलेले गुंड त्याला मारण्यासाठी समोर येतात.
आणखी वाचा – I Love You म्हणत आदित्यने पारूला केलं प्रपोज, मात्र हे सत्य की असत्य? नवीन प्रोमोमुळे उत्सुकता शिगेला
तेव्हा सलमान म्हणतो की, “ऐकलं आहे की खूप सारे लोक माझ्या मागे पडले आहेत? फक्त मी वळायचा बाकी आहे”, असं म्हणून सलमान त्या गुंडांना मारू लागतो. या टीजरमध्ये सलमान जबरदस्त ॲक्शन सीन करताना दिसत आहे. यामध्ये त्याचा जबरदस्त अंदाज बघायला मिळत आहे. तसेच बॅकग्राऊंड म्युजिकदेखील लक्षवेधी ठरत आहे. आता पुढे काय होणार? याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.
आणखी वाचा – उर्मिला कोठारेच्या गाडीची दोन मजुरांना धडक, एकाचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय झालं?
‘सिकंदर’ या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदनादेखील दिसणार आहे. या चित्रपटाचा पहिला टीजर सलमानच्या ५९ व्या वर्षी २७ डिसेंबर रोजी प्रदर्शित करणार होते. मात्र एक दिवस आधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाल्याने तारीख पुढे ढकलण्यात आली. या चित्रपटाचे बजेट ४०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.