शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Paaru Marathi Serial : ‘पारू’ मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री, दिसणार ‘ही’ अभिनेत्री, किर्लोस्कर कुटुंबात वादळ म्हणून येणार का?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 15, 2024 | 4:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Paaru Marathi Serial Update

'पारू' मालिकेत नव्या पात्राची एंट्री, दिसणार 'ही' अभिनेत्री, किर्लोस्कर कुटुंबात वादळ म्हणून येणार का?

Paaru Marathi Serial Update : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. सध्या मालिकेत नवनवीन ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. सध्या मालिकेत पारुमुळे अहिल्यादेवींवर होणार हल्ला टळला आहे. त्यामुळे पारू सगळ्यांच्या नजरेत मोठी झालेली पाहायला मिळाली. तर आदित्यनेही पारूचं कौतुक केलं. इतकंच नव्हे तर यापुढे कधीही अविश्वास दाखवणार नाही असंही तो म्हणाला. तर पारू मालिकेत दिशा नावाचं वादळ पुन्हा घोंगावताना दिसत आहे. दिशाचा किर्लोस्कर घराचा नाश करण्याचा अयशस्वी झाला आहे. त्यामुळेच आता दिशा पुन्हा एकदा सूड घेण्यासाठी सज्ज झाली आहे. या प्रकरणात दिशाला एक महिला मदत करताना दिसली आहे.

बरेच दिवसांपासून दिशाला मदत करणारी ती महिला नेमकी कोण आहे असा प्रश्न भंडावून सोडत होता. अशातच मालिकेत एका पात्राची एंट्री झाली आहे. ही एंट्री नेमकी कोणाची आहे हे गुपित अखेर उलगडलं असल्याचं समोर आलं आहे. मालिकेत अभिनेत्री श्वेता खरातची एंट्री झालेली पाहायला मिळत आहे. गेले दोन दिवस आर्किटेक्चर अनुष्काची मालिकेत हवा झाली. अखेर आज या अनुष्काचा चेहरा समोर आला आहे.

आणखी वाचा – ‘बिग बॉस १८’ मधील ‘या’ स्पर्धकाच्या गर्लफ्रेंडने केली ब्रेकअपची घोषणा, थेट पोस्ट शेअर करत म्हणाली, “माझा स्वाभिमान…”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

समोर आलेल्या प्रोमोमध्ये एक्झिबिशनमध्ये १०० वर्ष जुन्या पेंटींगचा लिलाव होतो. यावेळी अहिल्यादेवी १ करोड रुपये किंमत लावतात. त्यावर अनुष्काची एंट्री होते. अनुष्का अहिल्यादेवींनी क्रॉस करत १ करोड २५ लाखांची किंमत लावते.यावर अहिल्यादेवी अनुष्काला म्हणतात, “महागात पडला तुला हा सौदा”. यावर अनुष्का अहिल्यादेवींना उत्तर देत म्हणते, “सौदा करणं मी तुमच्याकडून शिकली आहे. तुमच्यामुळे जिंकली आहे मी हा सौदा”.

आणखी वाचा – लोकप्रिय बॉलिवूड गायकाच्या कॉन्सर्टसाठी तेलंगणा सरकारकडून नोटीस, ‘या’ गाण्यांवर घातली बंदी, नेमकं असं काय झालं?

प्रोमो पाहून आता अनुष्काने केलेला हा सौदा नक्की कोणाला भारी पडणार आहे असा प्रश्न पडला आहे. जिंकण्याचा श्रेय अहिल्यादेवींना देणारी ही अनुष्का नक्की आहे तरी कोण हा प्रश्नही साऱ्यांना भंडावत आहे. इतकंच नाही तर अनुष्का व दिशाचं नेमकं काय कनेक्शन असेल हे सुद्धा गुपित ठेवण्यात आलं आहे.

Tags: marathi serialpaaru marathi serialpaaru marathi serial update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
 Nikhil Rajeshirke Wedding 

‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता अडकणार लग्नबंधनात, प्री-वेडिंग शूटसह मेहंदी समारंभाची झलक समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.