Digvijay Rathee Unnati Tomar Breakup : ‘बिग बॉस १८’ हे यंदाचं पर्व विशेष धुमाकूळ घालताना दिसत आहे. या पर्वातील स्पर्धक खेळाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असलेले पाहायला मिळाले आहेत. अशातच यंदाच्या या पर्वातील स्पर्धक दिग्विजय सिंह राठीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. दिग्विजय सिंह राठी सध्या ‘बिग बॉस’च्या घरात आहेत. अशा परिस्थितीत त्याची गर्लफ्रेंड उन्नती तोमरने एक पोस्ट शेअर केली आहे. उन्नतीने केलेली ही पोस्ट वाचून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. उन्नतीने तिच्या ब्रेकअपची घोषणा थेट पोस्ट शेअर करत सोशल मीडियाद्वारे दिली आहे. या पोस्टमध्ये उन्नती तिच्या स्वाभिमानाबद्दल बोलताना दिसली आहे.
उन्नतीनं ही पोस्ट शेअर करताच सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. उन्नतीने तिच्या चाहत्यांना तिला ‘दिग्विजय’ म्हणू नका अशी विनंती केली आणि सांगितले की, ती ‘बिग बॉस १८’ मध्ये राठीला सपोर्ट करत नाही. चाहत्यांचे म्हणणे आहे की, उन्नती आता स्वतः दिग्विजय सिंह राठीपासून वेगळी झाली आहे. आणि तिने ब्रेकअपची घोषणा इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.
दिग्विजय सिंह राठी अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करताना दिसतात. ती तिच्या चाहत्यांना तिच्या भावना सांगताना दिसते. आता अशा परिस्थितीत उन्नतीने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “हाय मित्रांनो, मी तुम्हाला विनंती करते की, कोणत्याही दिगनती रील किंवा संपादनात माझा उल्लेख करु नका. तसेच दिगनतीला पाठिंबा देणे बंद करा”. वास्तविक, दिग्विजय व उन्नती यांच्या चाहत्यांनी दोघांची नावे एकत्र करुन त्यांचे नाव दिग्विजय ठेवले होते.
आणखी वाचा – लेकाला शोमध्ये बोलावल्याचा अमिताभ बच्चन यांना पश्चाताप, अभिषेकने पोलखोल करत वडिलांनाच केलं ट्रोल
पुढे तिने लिहिलं आहे की, “दिग्विजयच्या पीआर टीमकडून माझ्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, त्यामुळे कृपया मला दिग्विजयशी संबंधित काहीही शेअर करु नका. मला त्याला पाठिंबा द्यायचा आहे, पण दिग्विजयच्या टीमला मी त्याला पाठिंबा द्यावा असे वाटत नाही. त्यामुळे माझ्याकडूनही अधिकृतपणे हे पुरेसे आहे. माझा स्वाभिमान शीर्षस्थानी आहे, जो मी बऱ्याच काळापासून गमावत आहे”. दिग्विजय आणि उन्नती यांनी स्प्लिट्सविला सीझन ५ नंतर डेट करायला सुरुवात केली होती.