Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अहिल्यादेवी त्यांच्या खास पाहुण्यांसाठी साग्र संगीत जेवणाचा बेत आखतात आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी घरातील सर्व मंडळींना सांगतात. तयारी पूर्ण झाल्यानंतर अहिल्यादेवी प्रीतमला सांगतात की, तू जाऊन पाहुण्यांना घेऊन ये. त्याच वेळेला अहिल्यादेवींना आठवतं की श्रीकांतने गोळ्या घेतल्या नाही आहेत म्हणून त्या श्रीकांतला गोळ्या द्यायला म्हणून त्यांच्या खोलीत जातात त्याच वेळेला तिथे मारुती व गणी येतात. त्यांना पाहून दिशा म्हणते की, तुम्ही आता या वेळेला इथे का आला आहात. तुम्ही बाहेर जा. आमच्याकडे खास पाहुणे येणार आहेत”. तितक्यात पाठीमागून सगळेच घरात काम करणारी लोक येतात त्यांना पाहून दिशा अजूनच आरडाओरडा करु लागते. तुम्ही आता का आला आहात. तुम्ही सगळे आपापल्या कामाला जा. आता आमच्याकडे खास पाहुणे येणार आहेत. नको त्या वेळेला तुम्ही कुठेही येत आहात, असं त्यांना काही ना काही बडबडत असताना अहिल्यादेवी वरुन सगळं काही ऐकतात आणि दिशाला थांबायला सांगतात.
त्या दिशाला म्हणतात, दिशा तू काय बोलतेस. तुला तरी कळत आहे का?, तू आत्ताच्या आत्ता त्यांची माफी माग. त्यावर मारुती अहिल्यादेवींना सांगतो जाऊद्या मॅडम तसं काही नाही आहे. त्यावर अहिल्यादेवी सांगतात की, आज चांगला दिवस आहे म्हणून मी तुला सोडते नाहीतर मी बरोबरच केलं असतं. त्यानंतर अहिल्या देवी सांगतात की, आजचे हे खास पाहुणे हेच आहेत जे आपल्यासाठी दिवस रात्र मेहनत करत असतात त्यांच्या आज आपण पाहुणचार करणार आहोत. त्यानंतर अहिल्यादेवींनी सांगितल्यावर दिशा दामिनीचा चेहरा चांगलाच खाली पडतो. तर अहिल्यादेवी दामिनीला सगळ्यांचे हात धुवायला सांगतात. हात धुवून झाल्यावर सगळेजण जेवायला पानावर बसतात त्यानंतर इकडे पारू किचनमध्ये आलेली असते. आणि ती मनातल्या मनात विचार करते की, आज माझ्या बा आणि गणिचा माझ्या घरात आदर केला जात आहे हे पाहून मी खूप खुश आहे. तेव्हा तिथं दिशा येते आणि म्हणते की, तू सुद्धा या घरातली नोकर आहेस. तू का जेवायला बसली नाहीस, असं म्हणत तिला हाताला खेचून घेऊन जाते आणि जेवायला बसायला सांगते.
आणखी वाचा – जान्हवी किल्लेकरच्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याला पाहिलंत का?, आठ वर्षांचा आहे लेक, फोटो व्हायरल
अहिल्यादेवी हे सगळं काही पाहतात आणि म्हणतात की, पारू या घराची नोकर नाही आहे आणि हे सगळे सुद्धा या घराचे नोकर नाही आहेत. आणि पारू या कुटुंबाचा एक भाग आहे आणि पारू या घराची सदस्य आहे. त्यामुळे ती आपल्याबरोबर जेवायला बसेल हे ऐकल्यावर दिशाचा चेहरा आणखीनच खाली पडतो. त्यानंतर दिशा व दामिनी खोलीत गिफ्ट आणायला म्हणून जातात पण त्यानंतर खोलीत गेल्यावर ते म्हणतात की, इतके महागडे गिफ्ट या नोकरांना कसे द्यायचे असे म्हणून दिशा त्यांच्यासाठी दुसरे गिफ्ट ऑर्डर करत असते. तितक्यात तिथं प्रीतम येतो आणि सांगतो की, चला चला गिफ्ट घेऊन. तुम्हाला आईने खाली बोलावलं आहे. त्यानंतर सगळेच महागडे गिफ्ट घेऊन त्या खाली येतात. अहिल्यादेवी सगळ्यांचे आभार मानतात.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : छोटा पुढारीला कोसळलं रडू, शेवटी धनंजय पोवारनेच दिली साथ, म्हणाला, “माझ्या घरच्यांना…”
तर सगळेचजण अहिल्यादेवींचे आभार मानतात. त्यानंतर दामिनीच्या हस्ते सगळ्यांना गिफ्ट दिले जातं आणि सगळीच मंडळी गिफ्ट घेऊन जातात. त्यानंतर अहिल्यादेवी जबरदस्ती आदित्यला जेवायला देतात. आदित्यला गोळ्या घ्यायच्या असतात म्हणून त्या त्याला स्वतःच्या हाताने भरवतात. त्यानंतर आदित्यचं उष्ट अन्न ताटात राहतं ते ताट घेऊन पारू किचनमध्ये जाते आणि त्या ताटाला नमस्कार करत स्वतः ते ताटातलं अन्न खाते आणि म्हणते की, तुमच्या ताटात जेवायचं सुख काही वेगळंच आहे, असं म्हणत ती दोन घास खाते. ते सर्व काही प्रीतम पाहतो. आता प्रीतमला पारूचं सत्य कळणार का?, पारू प्रीतमला सगळं सत्य सांगणार का?, हे सारं पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.