अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत सानिया ही भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली. तिनं साकारलेली सानिया ही भूमिका प्रेक्षकांना खलनायिका म्हणून प्रचंड आवडली. अभिनेत्रीच्या या भूमिकेचं बरंच कौतुकही केलं गेलं. सध्या जान्हवी ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. उत्तम खेळ खेळत जान्हवीने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. तिच्या खेळावरुन काहीजण तिचं कौतुक करत आहेत तर काहींना तिचा हा खेळ खटकत आहे. खेळाबरोबरच जान्हवीचा ग्लॅमरस लुकही चर्चेचा विषय ठरत आहे. (Bigg Boss Marathi season 5 jahnavi killekar)
जान्हवीच्या स्टाइलचीही सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. याआधी जान्हवीने ‘राधा प्रेम रंगी रंगली’, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ तसंच ‘फुलपाखरू’ सारख्या लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली. पण जान्हवीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली ती, ‘कोलीवाडा झिंगला’ या म्युझिक अल्बममधून. मालिकाविश्वात आणि आता ‘बिग बॉस मराठी’ या रिऍलिटी शोमध्ये सक्रिय असलेल्या जान्हवीच्या रिअल लाइफबाबत फार कमी जणांना ठाऊक असेल.
जान्हवी खऱ्या आयुष्यात आठ वर्षाच्या चिमुकल्याची आई आहे. जान्हवीनं तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार काही चाहत्यांसह शेअर केलं नाही. असं असलं तरी ती नेहमीच सोशल मीडियावरुन कुटुंबाबाबत काही ना काही शेअर करत असते. सासरच्या मंडळींसह जान्हवी बरेचदा दिसते. जान्हवीचं लग्न झालं असून तिला आठ वर्षांचा मुलगादेखील आहे. किरण किल्लेकर असं तिच्या पतीचं नाव आहे. तर ईशान असं तिच्या मुलाचं नाव आहे. ईशानसाठी ती अनेकदा पोस्ट शेअर करत भावना व्यक्त करत असते.
‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ मध्ये जान्हवी तिच्या डोक्याने न खेळता ती निक्कीच्या छत्रछायेखाली खेळत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. पहिल्याच आठवड्यात जान्हवी व आर्यामध्ये मारामारी झाली. त्यानंतर भाऊचा धक्कामध्ये रितेशने जान्हवीची चांगलीच शाळा घेतली. तर दुसऱ्या आठवड्यात जान्हवी व सूरज यांच्यात बाचाबाची झालेली पाहायला मिळाली. शिवाय जान्हवी व निक्की यांचंही फिस्कटलं असल्याचं पाहायला मिळत आहे.