Suraj Chavan Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Winner : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ च्या विजेतेपदावर गोलीगत फेम सूरज चव्हाणने नाव कोरलं. यंदाची मानाची ट्रॉफी सूरज चव्हाणने पटकावली. तर अभिजीत सावंत हा उपविजेता ठरला. सूरज चव्हाण विजेता होताच सर्वच क्षेत्रातून त्याचं भरभरुन कौतुक करण्यात येत असल्याचं पाहायला मिळालं. मनोरंजन विश्वातूनच नव्हे तर राजकीय क्षेत्रातूनही सूरजचं कौतुक झालं. ‘बिग बॉस’च्या घरात सूरज चव्हाण त्याच्या साध्या वागणुकीने, भोळ्या स्वभावाने जितका चर्चेत राहिला तितकाच तो त्याच्या लग्नाच्या वक्तव्यांमुळेही चर्चेत राहिला. ‘बिग बॉस’च्या घरात असताना त्याने यापूर्वी अनेकदा त्याच्या लग्नाबाबत चर्चा केलेली पाहायला मिळाली.
याआधी त्याने ‘बिग बॉस’च्या घरात सूरजने त्याच्या लग्नाचं प्लॅनिंग निक्की व अभिजीतबरोबर केलं होतं. यावेळी सूरजने त्याला छोट्या पद्धतीने लग्न करायचं असल्याचं सांगितलं. त्याला त्याचं लग्न जास्त पण मोठ्या पद्धतीने नाही तर अगदी थोडक्यात करायचं आहे. देवी मरीमातेच्या देवळात एकमेकांच्या गळ्यात हार घालत साध्या पद्धतीने त्याने लग्न करायचं आहे असं म्हटलं होतं. तसंच त्याने अनाथ मुलीबरोबर लग्न करायचे असल्याचेही म्हटलं होतं.
आणखी वाचा – Video : “दाजी एकदम भारी…”, अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सूरजचं भाष्य, बहीण-भावाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल
यापूर्वी सूरजने ‘बिग बॉस’च्या घरात असताना त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचा उल्लेख केला होता. आता ‘टीव्ही ९’ शी संपर्क साधताना सूरजने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडबाबत केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. “एक्स गर्लफ्रेंड परत आली तर स्वीकारणार का?”, असा सवाल सूरजला विचारण्यात आला. याचं उत्तर देत सूरज म्हणाला, “बच्चाला आत्ता बच्चा झाला आहे. आता कसं करु? बच्चाला बच्चा झाला आहे. आता नाही करु शकत. नवीन एखादं पिलू बघायचं. साधं, सिंपल. एक नंबर माझं पिलू”.
आणखी वाचा – Bigg Boss 18 च्या ‘या’ सदस्याचा दोनवेळा घटस्फोट, दुसऱ्या पत्नीनेही सोडलं कारण…; आता आयुष्य बदलणार
अशातच सूरजने पुन्हा एकदा त्याच्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे, बिग बॉस मराठीचा विजेता झाल्यानंतर त्याने ‘इट्स मज्जा’शी संवाद साधला. यावेळी तो असं म्हणाला की, “तिने माझ्या पोटापाण्याचं बघावं. लाडाने आणि गोडीने घास भरवावं. माझ्या खूप काही अपेक्षा नाहीत. तिला पाहिजे तसं तिने वागावं. माझी तिच्याच्याकडे फक्त एकच विनंती असेल की, तिने साडी घालून आणि डोक्यावर पदर घेऊन असावं. बस्स…”. सूरजच्या या लग्नाच्या चर्चा आता सोशल मीडियावरही चांगल्याच व्हायरल होताना दिसत आहेत.