Bigg Boss Marathi 5 : गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रविवार ६ ऑक्टोबर रोजी पार पडला. महाराष्ट्राची मनं जिंकणारा सूरज चव्हाण या शोचा विजेता ठरला. खेळाडूवृत्ती, मितभाषी, कोणाशी पंगा न घेणारा, प्रामाणिक, मातीशी जोडलेला गोलीगत सूरज चव्हाण नेहमीच चर्चेत राहिला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री घेतल्यापासूनच त्याने स्वतःचं वेगळेपण दाखवलं आणि अखेर या शोची ट्रॉफी जिंकत त्याने सर्वांची मनंदेखील जिंकली. ट्रॉफी जिंकताच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यानंतर त्यांनी घरातील काही सदस्यांची भेटही घेतली. (Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan)
ग्रँड फिनाले होताच बाहेर आल्यानंतर ‘टीम बी’च्या सर्व स्पर्धकांनी एकत्र दुपारचे जेवण केले आणि यावेळी सूरज, डीपी आणि अंकिता यांनी धमाल मजामस्तीही केली. अंकिताने या धमाल मजमस्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये सूरज जान्हवीला भेटताना अंकिता त्याला गमतीत असं म्हणते की, “मला विसरला ना?… राहूदे… राहुदे… आता तू काय अंकिता ताईला विसरला रे…” यानंतर ती कॅमेरामध्ये स्वतःसह सूरजला घेते आणि म्हणते की बघा बघा झापुक झुपूक आम्हाला विसरला… आम्ही आता बिग बॉस विनरबरोबर दुपारचे जेवण करत आहोत. आहोभाग्य आमचे…”
आणखी वाचा – “काहींना माझी पद्धत खटकली पण…”, सूरज चव्हाणवरुन सुनावणाऱ्यांना अंकिताचं उत्तर, म्हणाली, “त्याला शिकवलं…”
पुढे दोघेही सूरजचा लोकप्रिय डायलॉग “झापुक झुपूक बच्चा… झापुक झुपूक बच्चा…” असं म्हणतात. त्यानंतर अंकिता त्याला असं म्हणते की, “सूरज दाजी कसा दिसतो?” यावर सूरज एकदम भारी असं उत्तर देतो. त्यावर अंकिता त्याला असं म्हणते की, “कुणाला सांगू नको हा…” त्यानंतर सूरज असं म्हणतो की, “मी नाही कुणाला सांगत. लपवून ठेवतो हा.. दिलातचं ठेवतो…” दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात अंकिता व सूरज यांच्या केमिस्ट्रीने सर्वांचे मनोरंजन केलं होतं. तीच केमिस्ट्री त्यांनी घराबाहेरही टिकवून ठेवली आहे, याबद्दल सर्वजण दोघांचे कौतुक करताना दिसून येत आहेत.
आणखी वाचा – नवरात्रीच्या सहाव्या दिवशी गजकेसरी राजयोगामुळे कर्क व सिंह व राशीच्या लोकांना धनलाभ, जाणून घ्या…
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ५’चा महाविजेता ठरलेल्या सूरजला ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीसह रोख रक्कम १४ लाख ६० हजार आणि ईलेक्ट्रिक बाइकही मिळाली आहे. तसेच केदार शिंदेंनी त्याला घेऊन ‘झापुक झुपूक’ नावाचा चित्रपट करणार असल्याची घोषणादेखील केली आहे. त्यामुळे सूरजच्या या विजयावर कलाकारांसह राजकीय मंडळींनीही आनंद व्यक्त केला आहे.