Diljit Dosanjh Faces Lots Of Tension : दिलजीत दोसांझ हा जगभरातील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. जगभरात त्याचे करोडो चाहते आहेत. सध्या त्याच्या ‘दिल लुमिनाटी’ टूरमध्ये व्यस्त असलेल्या दिलजीत दोसांझला आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. तेलंगणा सरकारने हैदराबादमध्ये त्याच्या मैफिलीपूर्वी त्याच्या अल्कोहोलशी संबंधित गाण्यांवर बंदी घातली तेव्हा हा वाद समोर आला. इतकेच काय तर, दिलजीतला कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आली होती. दरम्यान, आता गायकाने सांगितले आहे की त्याला या वादामुळे दररोज अनेक तणाव आणि समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
दिलजीत दोसांझने नुकताच पुण्यात एक कॉन्सर्ट केला. याचा एक व्हिडीओ त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी दररोज येणाऱ्या समस्यांबरोबरचं योगाचे महत्त्वही उपस्थितांना सांगितले. तणावाबाबत बोलताना दिलजीत दोसांझ म्हणाला की, “आयुष्यात अडचणी येतील, तणाव येतील. मला रोज किती टेन्शन येतंय तेही सांगता येत नाही. त्यामुळे जेवढे मोठे काम तेवढे मोठे टेन्शन”. दिलजीतच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून अनेक कमेंट येत आहेत. याच व्हिडीओमध्ये दिलजीत योगाबद्दल बोलताना म्हणाला की, ‘जर एखादी व्यक्ती रोज योगा करत असेल तर त्याच्या कामाचा वेग दुप्पट होतो. कारण मग त्यानुसार गोष्टी घडू लागतात’. दिलजीतने असेही सांगितले की, ‘तो संत नाही, पण त्याला माहित आहे की जो व्यक्ती जीवनात रोज योगासने करतो तो काहीही साध्य करु शकतो’.
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टबद्दल बोलायचे झाले तर त्याने आतापर्यंत दिल्ली, हैदराबाद, लखनऊ, पुणे आणि जयपूरसह अनेक शहरांमध्ये कॉन्सर्ट केले आहेत. परदेशातही त्याने कार्यक्रम केले आहेत. आता येत्या काही दिवसांत तो कोलकाता, बेंगळुरू, चंदीगड, इंदूर आणि गुवाहाटी येथे परफॉर्म करणार आहे. काही दिवसांपूर्वी तेलंगणा सरकारने नोटीस जारी करताना दिलजीतच्या ३ गाण्यांवर बंदी घालण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं.
आणखी वाचा – “तू म्हातारी झालीस हे स्वीकार”, नेटकऱ्याने डिवचताच ऐश्वर्या नारकर भडकल्या, उत्तर देत म्हणाल्या, “वेळ येते…”
ही नोटीस सरकारने गायक संघ आणि हॉटेल नोवोटेलला पाठवली आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे की, दिलजीत दोसांझने हैदराबादमधील त्याच्या लाइव्ह शोदरम्यान दारू, ड्रग्स, मादक पदार्थ किंवा हिंसेला प्रोत्साहन देणारी गाणी (पंज तारा, केस आणि पटियाला पेग) गाऊ नयेत. दिलजीत दोसांझच्या विरोधात अशा गाण्यांवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या चंदीगड येथील प्राध्यापक पंडितराव धारनवार यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन तेलंगणा सरकारने हे पाऊल उचलले आहे.