Aishwarya Narkar On Trolling : कलाकार म्हटलं की ट्रोलिंग हे आलंच. कोणताच कलाकार हा या ट्रोलिंगच्या कचाट्यातून सुटलेला नाही. अनेकदा कलाकार मंडळी नेटकऱ्यांच्या तावडीत सापडलेले पाहायला मिळाले आहेत. बरेचदा ही कलाकार मंडळी या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर देताना दिसतात. तर काहीवेळा या ट्रोलिंगकडे दुर्लक्षही करतात. अशातच मराठी मालिकाविश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री जी बरेचदा ट्रोलिंगचा सामना करते आणि नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर देताना दिसते, ती अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर या सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलिंगच्या शिकार झालेल्या पाहायला मिळाल्या आहेत.
आजवर ऐश्वर्या यांनी अनेक मालिका, चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. वयाची पन्नाशी गाठलेल्या या अभिनेत्रीचं सौंदर्य एखाद्या तरुणाईला लाजवेल असं आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्या बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच त्या काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात . ऐश्वर्या या नेहमीच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन रील व्हिडीओ पोस्ट करत असतात. ऐश्वर्या यांचे डान्स व्हिडीओ मिलियन व्ह्यूजच्या घरात जातात. लाखो प्रेक्षकांची या व्हिडीओला पसंती असली तरी त्यांचे हटके व्हिडीओ पाहून अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
अशातच ऐश्वर्या यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक रील व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांनी पसंती दर्शवलेली पाहायला मिळतेय. मात्र या व्हिडीओवरील एका कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. नेटकाऱ्याने केलेल्या कमेंटने त्याने ऐश्वर्या यांना डिवचलं आहे. “तू म्हातारी झालीस हे स्वीकार कर. प्लिज”, अशी कमेंट नेटकऱ्याने केली आहे. नेटकऱ्याच्या या कमेंटवर ऐश्वर्या यांनी दिलेलं सडेतोड उत्तर साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
आणखी वाचा – Tharla Tar Mag : अर्जुनने दिलेलं प्रेमपत्र सायलीने फाडलं अन्…; दोघांच्या नात्यात दुरावा, प्रियाचा डाव यशस्वी
ऐश्वर्या यांनी नेटकऱ्याची कमेंट थेट स्टोरीला पोस्ट करत त्यांनाच सवाल केला आहे. यावेळी ऐश्वर्या यांनी असं म्हटलं की, “तुम्हालाही ते लाभो नाहीतर मध्येच जाण्याची वेळ येते. डॉक्टर इतकेही माहित नाही?”. सध्या ऐश्वर्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहेत.